वाठारात उसाची ट्रॉली घरात घुसली; तीन लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:22 AM2021-02-08T04:22:04+5:302021-02-08T04:22:04+5:30

नवे पारगाव : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे ट्रॅक्टर व ट्रॉलीमधील हुक तुटून उसाने भरलेली ट्रॉली रस्त्यालगतच्या घरात ...

A sugarcane trolley crashed into the house; Loss of three lakhs | वाठारात उसाची ट्रॉली घरात घुसली; तीन लाखाचे नुकसान

वाठारात उसाची ट्रॉली घरात घुसली; तीन लाखाचे नुकसान

Next

नवे पारगाव : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे ट्रॅक्टर व ट्रॉलीमधील हुक तुटून उसाने भरलेली ट्रॉली रस्त्यालगतच्या घरात घुसली. या घटनेत छाया शंकर शिंदे यांच्या घराचे तीन लाखाचे नुकसान झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वाठार - वारणानगर राज्यमार्गावर वाठार गाव कमानीजवळ छाया शंकर शिंदे यांचे रस्त्याकडेला घर आहे. कुंभोजवरून वारणा साखर कारखान्याकडे ट्रॅक्टर (के.ए. 29 टी 4510) हा दोन ट्रॉल्या भरून ऊस घेऊन जात होता. ट्रॅक्टर भरधाव जात असताना वाठार गाव कमानीजवळ असणाऱ्या स्पीड ब्रेकरवर ट्रॅक्टर व ट्रॉलीमधील हुक तुटले. ट्रॅक्टर पुढे निघून गेला आणि दोन ट्रॉल्या तशाच वेगाने रस्त्याकडेची गटार ओलांडून छाया शिंदे यांच्या घरासमोरील पाण्याचा हौद व जिना तोडून थेट घरात घुसला.

ट्रॉल्यांच्या धडकेमुळे घराचा स्लॅब कोसळला. रस्त्याकडेच्या गटर्समुळे ट्रॉलीचा वेग थोडा कमी झाला. त्यामुळे घरामध्ये असणाऱ्या माणसांची जीवित हानी टळली. वडगाव पोलिसात याबाबतचा गुन्हा नोंद नाही.

फोटो ओळी:

वाठार (ता. हातकणंगले) येथे वारणे कडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा हुक तुटल्याने ऊसट्रॉल्या घरात घुसल्या. (छाया : युवराज शिंदे)

Web Title: A sugarcane trolley crashed into the house; Loss of three lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.