रिफ्लेक्टरविनाच धावताहेत उसाची वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:50 AM2020-12-11T04:50:53+5:302020-12-11T04:50:53+5:30
संजय पाटील : देवाळे वार्ताहर उसाची वाहतुक करणारी वाहने पन्हाळा तालुक्याभरात रिफ्लेक्टरविनाच धावताहेत .यामुळे ...
संजय पाटील : देवाळे वार्ताहर उसाची वाहतुक करणारी वाहने पन्हाळा तालुक्याभरात रिफ्लेक्टरविनाच धावताहेत .यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असुन वाहनचालकांचे जीव धोक्यात येत आहेत.
दरवर्षी गाळप हंगाम होताच उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि जिल्हा पोलिस दलातर्फे उसाच्या वाहनांना रिफ्लेक्टर लावले जातात.यंदा तशी मोहिम अद्याप सुरु झालेली नाही.कारखान्यांनी गाळप सुरु करताच ऊस वाहतुकीला तालुक्यात वेग आला आहे.रात्रीच्यावेळी कारखान्यांच्या दिशेने धालणारी वाहने अंधारात दिसत नाहीत.त्यातुन अपघातांना निमंत्रण मिळत आहे.उसाच्या बहुतांश ट्रक रिफ्लेक्टर किंवा रेडियम लावलेले असतात.पण ट्रँक्टर्स मात्र सुरक्षेची कोणतिही काळजी न घेता भरधाल धावताना दिसतात.कर्णकर्कश्श गाणी लावुन आपल्याच धुंदीत निघालेल्या ट्रँक्टरचालकांना मागुन येणाऱ्या वाहनांचे भानच नसते.त्यांना रस्ताही दिला जात नाही.भरधाव वाहनाला उसाची ट्राँली अंधारात न दिसल्याने गतवर्षी काही अपघात झाले आहेत
अनेकांना नाहक जीव गमवावा लागला आहे .यंदाही यामुळे अपघाताची नोंद झाली नसली तरी त्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी गंभीर व मोठे अपघात घडण्यापुर्वीच रिफ्लेक्टरची कार्यवाही करण्याची मागणी होत आह
दिवसा कारखाना राज्यमार्गावर व गावभात घुसणारी ऊसाची वाहने वाहतुकीची कोंडी करत आहेत.पन्हाळा तालुक्यातुन वारणा,दालमिया,डी.वाय.पाटील असळज,कुंभी या साखर कारखान्याना उस मोठ्या प्रमाणात घातला जातो. त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील कोतोलीफाटा ते कोतोली गावापर्यंतच्या रस्त्यावर, कोल्हापुर-रत्नागिरी,कोल्हापुर-गगनबावडा,वारणानगर ते बोरपाडळे,वाठार ते वारणानगर या मार्गावर मोठी वाहतुक कोंडीला तोंड द्यावे लागते.
चौकट:-ऊसाच्या ट्राँली व बैलगाड्यांना रिफ्लेक्टर लावण्यासाठी साखर कारखान्यांना सक्ती करण्याची मागणी होत आहे.याकामासाठी अनेक स्वयंसेवी संस्थादेखी दरवर्षी याकामी पुढे येतात.त्यांचाही सहभाग घेता येईल.