वीज जोडणी तोडल्याच्या नैराश्यातून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:59+5:302021-07-17T04:20:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील गणेशनगर परिसरातील विशाल बाबू हट्टीकट्टी (वय २७) या तरुणाने गळफास लावून घेत ...

Suicide from depression due to power outage | वीज जोडणी तोडल्याच्या नैराश्यातून आत्महत्या

वीज जोडणी तोडल्याच्या नैराश्यातून आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील गणेशनगर परिसरातील विशाल बाबू हट्टीकट्टी (वय २७) या तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घरातील वीज जोडणी तोडल्याच्या नैराश्यातून विशालने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली. शहापूर पोलिसात या आत्महत्येची नोंद झाली आहे.

कामानिमित्त बाहेर गेलेली विशालची पत्नी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विशालने आत्महत्या केल्याने नागरिकांनी त्याच्या मृत्यूला महावितरणच जबाबदार असल्याचे सांगत तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी विशालचा मृतदेह विच्छेदनासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठवला.

याबाबत अधिक माहिती अशी, गणेशनगर परिसरात विशाल हट्टीकट्टी हा पत्नी व दोन लहान मुलांसह राहत होता. तो यंत्रमाग कामगार असून, गत दीड वर्षापासून कोरोना महामारी व आजारपणामुळे हट्टीकट्टी कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते. अलीकडे तो मिळेल तेथे गुंडी काम करत होता. या परिस्थितीमुळे त्याच्यासमोर उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाल्याने काही महिन्यांपासून त्याला घरगुती वीजबिल भरता न आल्याने जवळपास आठ हजार २०० रुपयांचे बिल थकीत होते. या थकबाकीपोटी शुक्रवारी सकाळी महावितरण कंपनीचे कर्मचारी हट्टीकट्टी याच्या घरी आले होते. त्यावेळी हट्टीकट्टी याने आपल्या परिस्थितीची जाणीव करुन दिली तसेच महिन्याभरात बिल भरतो. घरी लहान मुले असल्यामुळे वीज जोडणी तोडू नका, अशी विनवणी केली. परंतु, कर्मचाऱ्यांनी त्याचे काहीही न ऐकता वीज जोडणी तोडली व निघून गेले. त्यामुळे निराश झालेल्या विशालने घरात जावून दोरीने गळफास घेत आत्महत्या केली, अशी माहिती नगरसेवक राजू खोत यांनी दिली.

दरम्यान, विशालच्या मृत्यूला महावितरणच जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेवक खोत यांच्यासह नागरिकांनी केली. तसेच मृत्यूला कारणीभूत महावितरण कंपनीने हट्टीकट्टी कुटुंबाला नुकसानभरपाई द्यावी. त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यावर पोलिसांनी शनिवारी तुमची तक्रार घेतो, असे सांगितले.

फोटो ओळी

१६०७२०२१-आयसीएच-०४-विशाल हट्टीकट्टी

Web Title: Suicide from depression due to power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.