सरनोबतवाडी येथे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:28 AM2021-08-22T04:28:46+5:302021-08-22T04:28:46+5:30
गांधीनगर : सरनोबतवाडी येथील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणाऱ्या वैभव श्रीपती पाटील (वय ३०, रा. पेरीड, ता. शाहूवाडी, ...
गांधीनगर : सरनोबतवाडी येथील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणाऱ्या वैभव श्रीपती पाटील (वय ३०, रा. पेरीड, ता. शाहूवाडी, सध्या रा. मसुटे कॉलनी) याने राहत्या घरातील सिलिंग फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबतची फिर्याद आनंदा दत्तू महागावकर (रा. पेरीड) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी वैभव व त्याची पत्नी पूनम हे वर्षभरापासून सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात राहात होते. हे पती-पत्नी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून खासगी कंपनीत नोकरी करत होते. त्यांचे वर्षापूर्वीच लव्ह मॅरेज झाले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास वैभवने बेडरूममध्ये फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराचवेळ झाला दार उघडले नाही म्हणून पत्नीने दार ठोठावून पाहिले तरीही ते उघडले गेले नाही म्हणून पूनमने शेजाऱ्यांना व नातेवाईकांना बोलावून गॅलरीतून पाहिले असता, वैभवने गळफास लावून घेतल्याचे दिसले. डॉक्टरांनी तपासले असता तो मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास पोलीस हवालदार विराज डांगे करत आहेत.
२१ वैभव पाटील