कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा पुलाजवळ पडळच्या युवकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 05:40 PM2023-01-12T17:40:03+5:302023-01-12T17:40:29+5:30
दोन वेळा केला होता आत्महत्या करण्याचा प्रयत्न
प्रकाश पाटील
कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर असणाऱ्या बालिंगा पुलाखाली नदीपात्रात पडळ (ता. पन्हाळा) येथील दिलीप शिवाजी परीट (वय २७) या युवकाने आत्महत्या केली. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. आज, गुरुवारी (दि.१२) ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज बालिंगा पुलाच्या खाली भोगावती नदीपात्रात पाण्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मृतदेहाचे तोंड पाण्यात असल्याने ओळख पटत नव्हती. पोलिस पाटील सुरेश पाटील यांनी या बाबत करवीर पोलिसांना माहिती दिली. तर, स्थानिकांच्या साहाय्याने नदीतून मृतदेह बाहेर काढला. यानंतर तो पडळ येथील दिलीप परीट याचा असल्याचे समोर आले.
उचशिक्षित असणाऱ्या दिलीपला आईने अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण दिले होते. गावातीलच एका ग्रंथालय तो क्लार्क म्हणून काम करत होता. पण गेली काही दिवस त्याचे मानसिक स्वास्थ बिघडल्याचे सांगण्यात येते. सात महिन्यापूर्वी तो घरातून निघून गेला होता. कोल्हापुरात त्याच्या मोठ्या भावाला सापडल्यानंतर त्याला घरी आणले होते. त्याने दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.