तळसंदेत वृद्धाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:55+5:302021-03-13T04:43:55+5:30

नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील आनंदा ज्ञानू नाईक (वय ७२) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ...

Suicide of an old man at the bottom | तळसंदेत वृद्धाची आत्महत्या

तळसंदेत वृद्धाची आत्महत्या

Next

नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील आनंदा ज्ञानू नाईक (वय ७२) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची नोंद वडगाव पोलिसांत झाली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : तळसंदे येथील कृषी कार्यालयाजवळ आनंदा नाईक हे कुटुंबासह राहत होते. तेथून जवळच असलेल्या बिरदेव मंदिराच्या पाठीमागील झाडास दोरीने त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

नवे पारगावच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता शहा यांनी उत्तरीय तपासणी केली. वडगावचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष माने व राजेंद्र पाटील अधिक तपास करीत आहेत.

फोटो : ११ आनंदा नाईक

Web Title: Suicide of an old man at the bottom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.