हळदी येथे नवदाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Published: May 18, 2015 01:18 AM2015-05-18T01:18:27+5:302015-05-18T01:18:27+5:30

किरकोळ वादातून कृत्य : पहिल्यांदा पत्नीची, नंतर पतीची नैराश्येतून आत्महत्या

Suicide by taking a bribery in Haladi | हळदी येथे नवदाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

हळदी येथे नवदाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next

सडोली खालसा : हळदी (ता. करवीर जि. कोल्हापूर) येथे नवदाम्पत्याने घरातील किरकोळ वादातून गळफास घेऊन आत्महत्या केली. महादेव शिवाजी जाधव-पाटील (वय २२) त्यांची पत्नी संगीता महादेव जाधव-पाटील (२०, सध्या राहणार हळदी, ता. करवीर, मूळ गाव भोसा, ता. जि. परभणी) अशी त्यांची नावे आहेत. संगीता हिने शुक्रवारी (दि. १५) रात्री राहत्या घरी, तर महादेव याने पत्नीच्या पाठोपाठ शनिवारी रात्री झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान संगीताच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू सासऱ्यासह पाच जणांविरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
महादेव जाधव-पाटील हे कापड व्यवसायानिमित्त दोन वर्षांपासून हळदी (ता. करवीर) येथे राहात होते. त्यांचे मूळ गाव परभणी तालुक्यातील भोसा असून त्यांचे हळदी येथे इंद्रायणी साडी सेंटर हे कापड दुकान आहे. महादेव यांचा धसाळी (ता. परभणी) येथील सोपान सांगोजीराव शेरकर यांची मुलगी संगीता हिच्याशी २७ फेब्रुवारी २०१५ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर हे दोघे पती-पत्नी व महादेव यांचा मावसभाऊ यांच्यासह हळदी येथे राहत होते.
शुक्रवारी (दि. १५) रात्री नऊ वाजता पती-पत्नीत घरगुती कारणावरून वाद महादेव घरातून निघून गेला. त्याला शोधण्यासाठी संगीता व तिच्या मावस दिराने प्रयत्न केला; परंतु तो सापडला नाही. हे दोघे रात्री दहा वाजता घरी आले व पुन्हा संगीताचा मावसभाऊ महादेवला शोधण्यासाठी बाहेर पडला. यावेळी संगीताने घरातील सिलिंग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यादरम्यान महादेव घरी परतला. संगीता दार उघडत नाही म्हटल्यावर खिडकीची काच फोडून त्याने आत पाहिले असता फॅनला संगीता लटकत असलेली दिसली. त्यावेळी तिथून निघून गेलेल्या महादेवने शनिवारी (दि. १६) त्यानेही हळदी-सडोली दरम्यानच्या पुलाशेजारील करंजीच्या झाडास स्वत:च्या शर्टाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

Web Title: Suicide by taking a bribery in Haladi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.