चुये येथे तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:43 AM2021-02-18T04:43:42+5:302021-02-18T04:43:42+5:30
दिंडनेर्ली : कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या चुये (ता. करवीर) येथील महाविद्यालयीन तरुणी सानिका भीमराव व्हन्हाळकर (१९) ...
दिंडनेर्ली : कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या चुये (ता. करवीर) येथील महाविद्यालयीन तरुणी सानिका भीमराव व्हन्हाळकर (१९) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सानिका व्हन्हाळकर ही कोल्हापुरातील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. आर. के. नगर येथील आपल्या मामाच्या घरी राहत होती. मंगळवारी सकाळी कॉलेजवरून मामाच्या घरी आल्यानंतर तिने कीटकनाशक प्राशन केले. तेव्हा तिला उलट्या चालू झाल्या. नातेवाइकांनी तात्काळ तिला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात हलविले. उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन करून तिचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. तिच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण, आजी असा परिवार आहे. दरम्यान, सानिकाने कीटकनाशक प्राशन करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती.