वाकरेत तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:25 AM2021-05-10T04:25:14+5:302021-05-10T04:25:14+5:30
कोपार्डे : वाकरे (ता. करवीर) येथील महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अर्चना संजय कांबळे ...
कोपार्डे : वाकरे (ता. करवीर) येथील महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अर्चना संजय कांबळे (वय २१) असे तिचे नाव असून, ही घटना रविवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. अर्चनाचे वडील संजय हे बांधकाम कामगार होते. मागील वर्षी तिच्या वडिलांचा बांधकाम करत असताना कोल्हापूर येथे इमारतीवरून खाली पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आज अर्चनाने आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याने वाकरे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, अर्चना कांबळे ही स. ब. खाडे महाविद्यालयात कला शाखेत शिकत होती. रविवारी सकाळी घरात कोणीही नसल्याचे पाहून तिने राहत्या घरातील तुळईला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तिच्या आईला घरात आल्यानंतर लक्षात आली. यावेळी आईने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तिला खाली उतरवलेे. तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली असून, पुढील तपास सुरू आहे. अर्चना हिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
फोटो ०९अर्चना कांबळे सुसाईड