Kolhapur- ‘सीपीआर’मधील औषध घोटाळा: इंगवलेंनी क्षीरसागरांवर केलेल्या आरोपावर सुजित चव्हाणांचे स्पष्टीकरण, म्हणाले..

By विश्वास पाटील | Published: September 21, 2024 07:29 PM2024-09-21T19:29:04+5:302024-09-21T19:29:30+5:30

रविकिरण इंगवलेंचे आरोप द्वेषातून

Sujit Chavan explanation on Ravikiran Ingwal allegation against Kshirsagar in the CPR drug scam case | Kolhapur- ‘सीपीआर’मधील औषध घोटाळा: इंगवलेंनी क्षीरसागरांवर केलेल्या आरोपावर सुजित चव्हाणांचे स्पष्टीकरण, म्हणाले..

Kolhapur- ‘सीपीआर’मधील औषध घोटाळा: इंगवलेंनी क्षीरसागरांवर केलेल्या आरोपावर सुजित चव्हाणांचे स्पष्टीकरण, म्हणाले..

कोल्हापूर : राजकीय स्टंटबाजीपोटी रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांचा राजेश क्षीरसागर यांच्या विरोधातील द्वेष दिसून आला. क्षीरसागर यांच्या साध्या पत्रावरून निधी मंजूर होतो हीच क्षीरसागर यांची कार्यतत्परता इंगवले यांनी सिध्द केली. पण जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होईल असे स्पष्टीकरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी शनिवारी केले.

उद्धवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्र दिल्याने सीपीआरमध्ये औषध खरेदी झाली आणि त्यात ५ कोटींचा गैरव्यवहार झाला. त्यामुळे तेच या गैरव्यवहारास जबाबदार असल्याचा आरोप केला होता. क्षीरसागर यांच्यावतीने जिल्हाप्रमुख चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रक दिले. त्यात म्हटले आहे. निविदा प्रक्रिया राबविताना अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते. ही समिती शासकीय साहित्यांची खरेदी विक्री प्रक्रिया राबवण्याचे सर्व निर्णय घेते. त्या आधारे साहित्यांची खरेदी केली जाते. याची माहिती इंगवले यांना नसल्याने बिनबुडाचे आरोप केले आहेत. 

..त्याचप्रमाणे क्षीरसागर यांनीही पत्र दिले

या खरेदी प्रक्रियेत काय गैरव्यवहार झाला असल्यास शासन योग्य ती कार्यवाही करेल. क्षीरसागर यांच्या कार्यालयात हजारो पत्रे दिली जातात. त्यांच्याकडे अनेक व्यक्ती पत्राची मागणी करतात. अशा अनेक प्रकरणात बऱ्याच लोकप्रतिनिधीनी पत्रे दिले आहेत त्याचप्रमाणे क्षीरसागर यांनीही पत्र दिले. 

..नाहीतर इंगवलेसारखे गुंड कधीच शहरप्रमुख झाले नसते

क्षीरसागर यांच्याकडे कोण चोर कोण गुन्हेगार याची चौकशी करायला वेळ नाही, नाहीतर इंगवलेसारखे गुंड कधीच शिवसेना शहरप्रमुख झाले नसते. क्षीरसागर यांच्यासमोर सक्षम असा उमेदवार विरोधकांकडे नाही. त्याचमुळे त्यांच्या बदनामीचे कारस्थान विरोधकांकडून होत आहे. पण जनता सुज्ञ असून अशा कटकारस्थानांना जनता भिक घालणार नाही.

Web Title: Sujit Chavan explanation on Ravikiran Ingwal allegation against Kshirsagar in the CPR drug scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.