भुदरगड तालुक्यात शुकशुकाट, गारगोटीत लॉकडाऊनला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:22 AM2021-04-11T04:22:53+5:302021-04-11T04:22:53+5:30
गारगोटी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या शनिवार, रविवार या दोन दिवसांच्या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी गारगोटीसह तालुक्यातील ...
गारगोटी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या शनिवार, रविवार या दोन दिवसांच्या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी गारगोटीसह तालुक्यातील सर्वच गावांत शुकशुकाट होता. बंदला प्रतिसाद देण्यासाठी जनतेने स्वतःच्या घरी राहणे पसंद केले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. औषध दुकाने, पेट्रोल पंप, दुग्धजन्य पदार्थ, अशा अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व हॉटेल्स, किराणा मालाची दुकाने, भाजीमंडई बंद होती. रस्त्यावर वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू होती.
सकाळी फिरायला जाणारे, दूधवाले, पेपरवाले यांनीदेखील आज सकाळीच पेपर व दूध पोहोचवले होते. भुदरगड पोलिसांनी गारगोटी- कोल्हापूर, गारगोटी- गडहिंग्लज मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.
प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार अश्विनी आडसुळे, भुदरगड पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी लॉकडाऊनबाबतीत केलेल्या आवाहनाला लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.
१० गारगोटी रोड
-
फोटो ओळ- १) गारगोटी- कोल्हापूर रस्त्यावर शुकशुकाट.
(छाया : कृष्णराज कोटकर)