सूर्यकिरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 09:40 PM2021-02-02T21:40:08+5:302021-02-02T21:41:14+5:30
Mahalaxmi Temple Kolhapur-करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात मंगळवारी मावळतीची सूर्यकिरणे मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत आली. सायंकाळी सहा वाजून १८ मिनिटांनी किरणे गुडघ्यावर स्थिरावून डावीकडे लुप्त झाली.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात मंगळवारी मावळतीची सूर्यकिरणे मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत आली. सायंकाळी सहा वाजून १८ मिनिटांनी किरणे गुडघ्यावर स्थिरावून डावीकडे लुप्त झाली.
श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात मंगळवारी पाचवा दिवस होता. यंदाच्या सोहळ्यात मागील चार दिवसांपैकी पहिल्या दिवशी किरणोत्सव झाला नाही, दुसऱ्या दिवशी किरणांनी चरणस्पर्श केला. तिसऱ्या दिवशी किरणे देवीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत पोहोचली.
सोमवारी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव झाला नाही. मंगळवारी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी किरणे कटांजनपर्यंत आली. पुढे तीन मिनिटांत किरणे गुडघ्यापर्यंत येऊन डावीकडे लुप्त झाली. आता पुढील किरणोत्सव नोव्हेंबरमध्ये होणार आहे.