दुसऱ्या दिवशी सुर्यकिरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 07:06 PM2020-11-09T19:06:49+5:302020-11-09T19:09:10+5:30
कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात सोमवारी सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सुर्यकिरणे देवीच्या मुर्तीच्या गुडघ्यापर्यंत आली. थंडीचे दिवस आणि ढगाळ वातावरणामुळे सुर्यकिरणांची तीव्रता कमी होती.
कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात सोमवारी सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सुर्यकिरणे देवीच्या मुर्तीच्या गुडघ्यापर्यंत आली. थंडीचे दिवस आणि ढगाळ वातावरणामुळे सुर्यकिरणांची तीव्रता कमी होती.
श्री अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनदा किरणोत्सव सोहळा होता. या वर्षातील दुसरा किरणोत्सव रविवारपासून सुरु झाला. पहिल्या दिवशी किरणे पितळी उंबऱ्यापर्यंत येवून लुप्त झाली. तुलनेने सोमवारी किरणांची तीव्रता चांगली होती.
सायंकाळी पाच वाजता किरणे महाद्वार कमानीजवळ आली येथून गरुड मंडप, कासव चौक, पितळी उंबरा, कटांजन असा प्रवास करत किरणांनी ५ वाजून ४५ मिनिटांनी मूर्तीचा चरणस्पर्श केला. येथे एक मिनिट स्थिरावल्यानंतर ५ वाजून ४७ व्या मिनिटांला गुडघ्यापर्यंत आली. गुडघ्यावर एक मिनिट स्थिरावल्यानंतर किरणे डावीकडे लुप्त झाली.