शाहूचरित्र अभ्यासक विलासराव पोवार यांचे रविवारी व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:44+5:302021-06-04T04:18:44+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे (अंनिस) शाहूचरित्र अभ्यासक प्राचार्य डॉ. विलासराव पोवार यांचे रविवारी (दि. ६) सायंकाळी ...
कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे (अंनिस) शाहूचरित्र अभ्यासक प्राचार्य डॉ. विलासराव पोवार यांचे रविवारी (दि. ६) सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘प्लेगच्या साथीतील शाहू महाराजांचे कार्य’ असा आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी १२५ वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीमध्ये शास्त्रीय पद्धतीने प्रचंड कार्य केले. त्यांनी अत्यंत शास्त्रीय पद्धतीने प्लेगच्या साथीशी लढा दिला. आपल्या संस्थानातील प्रजेच्या जीवाचे रक्षण केले. सध्याच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हे कार्य आजच्या राज्यकर्त्यांनाही मार्गदर्शक असे आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे हे कार्य आजच्या पिढीला समजावे, या उद्देशाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हे व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे असतील. मॅक्स महाराष्ट्र, नरेंद्र दाभोलकर थॉट्स, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, सत्यशोधक व्याख्यानमाला या फेसबुक पेजवरून हे व्याख्यान लाईव्ह पाहता येईल.