क्रांतिकारी हौसाताई पाटील चरित्राचे रविवारी प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:27 AM2021-08-19T04:27:45+5:302021-08-19T04:27:45+5:30
कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याप्रमाणेच स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या त्यांच्या कन्या हौसाताई पाटील यांचे जीवनचरित्र लेखिका डॉ. शोभा शिरढोणकर ...
कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याप्रमाणेच स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या त्यांच्या कन्या हौसाताई पाटील यांचे जीवनचरित्र लेखिका डॉ. शोभा शिरढोणकर यांनी ‘क्रांतिसिंह नाना पाटील यांची क्रांतिकारी कन्या हौसाताई पाटील’ या कादंबरीत मांडले आहे. याचे प्रकाशन रविवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता शिवतेज सानेगुरुजी वसाहत येथे होणार आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते, लोककलेचे अभ्यासक सुनीलकुमार सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्य डॉ. प्रताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटीश सत्तेविरोधात लढा दिला, त्याचप्रमाणे त्यांची कन्या क्रांतिकारी हौसाबाई पाटील यांनीही आयुष्य पणाला लावून स्वातंत्र्याच्या होमकुंडात सर्वस्व झोकून देऊन काम केले, मात्र त्या आजवर दुर्लक्षित राहिल्या होत्या. या कार्यक्रमाला इतिहासप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकाशक एस. के. शिंदे यांनी केले आहे.
---
फोटो नं १८०८२०२१-कोल-हौसाताई पाटील बुक
---