चाटे शिक्षण समूह आणि रोटरी क्लबतर्फे रविवारी वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:24 AM2021-03-05T04:24:24+5:302021-03-05T04:24:24+5:30
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चाटे शिक्षण समूह, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरतर्फे रविवारी (दि. ७) वेबिनारचे आयोजन करण्यात आले ...
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चाटे शिक्षण समूह, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरतर्फे रविवारी (दि. ७) वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजता चाटे शिक्षण समूहाच्या फेसबुक पेजवर तसेच यु-ट्यूब चॅनेलवर याचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
‘मुलगी शिकली तर एक कुटुंब शिकले’ या धोरणानुसार मुलींच्या शिक्षणाला महत्त्व आहेच. परंतु पाल्याच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासात आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कुटुंबाचे आरोग्य हे स्त्रीच्या हातात असते. हा धागा पकडून हे व्याख्यान होणार आहे. यात कमला कॉलेजच्या डॉ. वर्षा मैंदरगी या ‘पाल्याच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासात आईची भूमिका’ या विषयावर, तर डॉ. मधुरा कातकडे-मोराळे या ‘आरोग्यम् धनसंपदा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचा Chate Group of Education या पेजवर सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. डॉ. भारत खराटे यांनी केले आहे.
---