मुलाचा प्रेमविवाह अमान्य असल्याने सासू-सासऱ्याकडूनच सुनेचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:45 AM2019-09-27T00:45:35+5:302019-09-27T00:46:23+5:30

कंदलगावमधील यशवंत हिंदोळे यांची रिया पाटील ही मुलगी. ती शाहूपुरीतील एका दवाखान्यात नोकरीला होती. दवाखान्याशेजारी काम करणारा बादल पाटील याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, रियाचे यापूर्वीही लग्न झाले असल्याने

Sune's mother-in-law murdered by accident | मुलाचा प्रेमविवाह अमान्य असल्याने सासू-सासऱ्याकडूनच सुनेचा गळा आवळून खून

मुलाचा प्रेमविवाह अमान्य असल्याने सासू-सासऱ्याकडूनच सुनेचा गळा आवळून खून

googlenewsNext
ठळक मुद्देफुलेवाडी रिंग रोड परिसरातील जयभवानी कॉलनीतील प्रकार

कोल्हापूर : मुलाने केलेला प्रेमविवाह मान्य नसल्याने सासू-सासºयाने सुनेचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार घडला. खुनाचा प्रकार लपविण्यासाठी दोघांनी सुनेचा मृतदेह दोरीने लटकावत आत्महत्येचा बनाव केला होता. मात्र, पोलिसांनी अवघ्या २४ तासांत हा बनावचा डाव उधळला. रिया बादल पाटील (वय ३४, रा. जयभवानी कॉलनी, फुलेवाडी रिंग रोड) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी सासरा सरदार रामचंद्र पाटील (५४), सासू सुनीता सरदार पाटील (५०) या दोघांना अटक करण्यात आली. बुधवारी (दि. २५) सायंकाळी सात वाजता हा प्रकार घडला होता; पण पोलिसांनी चौकशीअंती अवघ्या २४ तासांत हा बनाव उघड केला. गुरुवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल झाला.

कंदलगावमधील यशवंत हिंदोळे यांची रिया पाटील ही मुलगी. ती शाहूपुरीतील एका दवाखान्यात नोकरीला होती. दवाखान्याशेजारी काम करणारा बादल पाटील याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, रियाचे यापूर्वीही लग्न झाले असल्याने बादलच्या आई-वडिलांना हा लग्नाचा निर्णय मान्य नव्हता. त्यामुळे या लग्नाला त्यांचा कायम विरोध होता; पण त्यावेळी बादलने आत्महत्येची धमकी दिल्याने आई-वडीलही हतबल झाले अन् दोन वर्षांपूर्वी या दोघांचे लग्न झाले.

मूल होत नसल्याने नाराजी
रिया ही वारंवार आजारी पडत होती. तसेच तिला मूल होत नसल्याने सासरी नेहमी वाद होत होता. बादल हा एकुलता मुलगा असल्याने त्याचा वंश पुढे वाढण्यासाठी त्याने दुसरा विवाह करावा, अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती; पण त्याला बादलने विरोध दर्शविला होता.


विसंगतीमुळेबनाव उघड
खुनाचा संशय आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ रियाच्या पतीसह सासू-सासऱ्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत बादल याला कोणतीही माहिती नसल्याचे दिसून आले. मात्र, सासू सुनीता व सासरा सरदार यांच्या जबाबात विसंगती आल्याने दोघांकडेही कसून चौकशी केली असता खुनाचे सत्य बाहेर पडले अन् अवघ्या २४ तासांत खुनाचा उलगडा झाला.


मृताच्या मानेवर जखमा आढळल्या
रिया बादल हिच्या मृतदेहाचे विच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना रियाच्या मानेवर, हनुवटीवर जखमा आढळून आल्या. त्यांनी याची माहिती करवीरचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना दिली. त्यानंतर करवीर तहसीलदारांसमोर शवविच्छेदन करण्यात आले. रियाच्या मानेभोवताली कापडाने आवळल्याचे व्रण आढळून आले. याबाबत संशय आल्याने पोलिसांनी तिचा शवविच्छेदनाचा व्हिसेरा राखून ठेवला होता.


आत्महत्येचा बहाणा
बादल हा बुधवारी सकाळी कामावर गेला होता. त्याचे वडील सरदार पाटील, आई सुनीता पाटील व पत्नी रिया हे तिघेच घरात होते. चहा हवा असल्याने सरदार पाटील यांनी रियाला बोलावले असता ती खोलीत लटकत असल्याची दिसून आली. पाटील यांनी आरडाओरडा करून तिला खाली उतरविले. तिला उपचारासाठी ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. त्यानंतर बादल हा घरी आला; पण उपचारापूर्वी रियाचा मृत्यू झाला होता, असा बनाव दोघांनी केला होता. तसेच आत्महत्येबाबत सासू सुनीता पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: Sune's mother-in-law murdered by accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.