Kolhapur- अमर रहे!, शहीद जवान सुनील गुजर यांना शासकीय इतमामात अखेरची मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:30 IST2025-03-17T12:29:51+5:302025-03-17T12:30:55+5:30
वसंत पाटील पिशवी : अरूणाचल प्रदेश येथे चीन सीमेलगत वाहन अपघातात शहीद झालेले जवान सुनील विठ्ठल गुजर (वय २५) ...

Kolhapur- अमर रहे!, शहीद जवान सुनील गुजर यांना शासकीय इतमामात अखेरची मानवंदना
वसंत पाटील
पिशवी : अरूणाचल प्रदेश येथे चीन सीमेलगत वाहन अपघातात शहीद झालेले जवान सुनील विठ्ठल गुजर (वय २५) यांना त्यांच्या मुळ गावी शित्तुर तर्फ मलकापुर येथे शासकीय इतमामात मानवंदना देत हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रूपुर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थिताच्या अश्रूला बांध फुटला. वडील विठ्ठल गुजर यांनी भडाग्नी दिला.
अरूणाचल येथे भूस्खलन झालेल्या ठिकाणी डोझरच्या सहाय्याने मलबा हटवला जात होता. या डोझरवर चालक म्हणून सुनील कर्तव्यावर होते. दरम्यान डोझर घसरून खोल दरीत कोसल्याने सुनील यांना वीरमरण आले होते. हे वृत्त त्यांच्या गावी समजताच संपुर्ण शाहुवाडी तालुक्यावर शोककळा पसरली. बांबवडे बाजारपेठे सह परिसरातील गावांत बंद ठेऊन आंदराजली वाहली. जवान गुजर यांच्या अत्यंदर्शनासाठी बांबवडे पासुन त्यांच्या गावापर्यंत दोन्ही बाजुनी नागरिकांनी गर्दी केली होती.
कोल्हापूर येथून यांचे पार्थिव निवासस्थानी शित्तुर येथे मुख दर्शनासाठी आणल्यानंतर पत्नी, आई वडील बहिणी भाऊ मित्र परिवार व नातलग यांनी हंबरडा फोडला. त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. पोलिस प्रशासन, सैन्य दलाच्या वतीने प्रत्येक तीन फैरी हवेत झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी वीर जवान सुनील गुजर अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य़ कार्यकारी अधिकारी नयन कार्तिकेयन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, तहशिलदार रामलिंग चव्हाण, माजी आमदार सत्यजीत पाटील, मानसिंगराव गायकवाड, विजय बोरगे, धनंजय पाटील यांनी श्रध्दांजली वाहिली.
अपघाताच्या अर्धा तास अगोदर पत्नीचा फोन
सुनील व पत्नी स्वप्नाली यांची अवघ्या अडीच वर्षात कायमची ताटातुट झाली. तर अवघ्या सहा महिन्यांच्या मुलगा शिवांशच पितृछत्र हरपल. सुनीलच्या आई वडिलांनी दोन मुली, दोन मुलांचा शेती व वडाप व्यवसाय करत कुटुंबांचा उदरनिर्वाह केला होता. सुनिल त्यांच्या कुटुंबांतील पहिला शासकीय नोकरीमुळे कुटुंब स्थिरस्थावर होत आत्ता कुठे सुखांचे क्षण फुलत होते पण नियतीने त्यांचा आयुष्यांचा आधारच हिरावुन घेतल्याने त्यांच्यावर दुखांचा डोंगर कोसळला. अपघाताच्या अर्धा तास अगोदर पत्नी स्वप्नालीचा शेवटचा फोन झाला होता.