फसवणूक प्रकरणी औरंगाबाद येथे सुनील मोदींची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:33 AM2019-06-04T10:33:58+5:302019-06-04T10:36:01+5:30
वाईन शॉपचा परवाना देतो असे सांगून एक कोटी ९२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील सिडको पोलिसांनी कोल्हापुरात येऊन माजी नगरसेवक सुनील जबरचंद मोदी (रा. नागाळा पार्क) यांना ताब्यात घेऊन औरंगाबाद येथे नेऊन त्यांच्याकडे सखोलपणे चौकशी केली. या प्रकरणात सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चौघांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
कोल्हापूर : वाईन शॉपचा परवाना देतो असे सांगून एक कोटी ९२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील सिडको पोलिसांनी कोल्हापुरात येऊन माजी नगरसेवक सुनील जबरचंद मोदी (रा. नागाळा पार्क) यांना ताब्यात घेऊन औरंगाबाद येथे नेऊन त्यांच्याकडे सखोलपणे चौकशी केली. या प्रकरणात सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चौघांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
बडोदा बुद्रुक (ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) येथील विलास दादाराव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंत्री दिलीप कांबळे, सुनील मोदी यांच्यासह चौघाजणांवर न्यायालयाच्याआदेशानुसार दि. १३ मार्च २०१८ रोजी औरंगाबादमधील क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. नंतर तो सिडको पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
चव्हाण यांना वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून एक कोटी ९२ लाख रुपये ‘आरटीजीएस’द्वारे बँकेत जमा केले होते; पण परवाना न मिळाल्याने चव्हाण यांनी चौघांविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार औरंगाबाद येथील सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस शनिवारी (दि. १) कोल्हापुरात येऊन त्यांनी सुनील मोदी यांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेऊन औरंगाबाद गाठले. तेथे त्यांच्याकडे चौकशी करून त्यांना सोडून दिल्याचे समजते.