सुपर पिंक मूनचे होणार आज विलोभनीय दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 07:00 PM2021-04-26T19:00:58+5:302021-04-26T19:02:35+5:30

कोल्हापूर : चैत्र पौर्णिमेची ही पौर्णिमा ही खगोल अभ्यासकांसाठी विलोभनीय राहणार आहे. आज, २७ एप्रिल रोजी मंगळवारी रात्री वर्षातील ...

Super Pink Moon will be appealing today | सुपर पिंक मूनचे होणार आज विलोभनीय दर्शन

सुपर पिंक मूनचे होणार आज विलोभनीय दर्शन

Next
ठळक मुद्देघरूनच सुपरमूनचा आनंद घेणार लॉकडाउनमुळे कार्यक्रमाचे आयोजन नाही

कोल्हापूर : चैत्र पौर्णिमेची ही पौर्णिमा ही खगोल अभ्यासकांसाठी विलोभनीय राहणार आहे. आज, २७ एप्रिल रोजी मंगळवारी रात्री वर्षातील पहिला सुपरमून दिसणार असून वातावरण जर ढगाळ नसेल तर याचा आनंद अभ्यासकांना घेता येणार आहे. यावेळी चंद्र नेहमीपेक्षा दहा टक्के मोठा आणि २५ टक्के तेजस्वी दिसेल, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. अविराज जत्राटकर यांनी दिली आहे.

अवकाशात पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि नंतरचे दोन्ही दिवस पूर्णचंद्र दिसणार आहे. या काळात चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर सर्वात कमी असते.परंतु सध्या ढगाळ वातावरण असल्याने आणि हवामान खात्याने पाउस पडण्याची शक्यता वर्तवल्यामुळे खगोल अभ्यासकांना या सुपर पिंक मूनचे दर्शन दुर्लभ आहे. कोरोनाच्या विषाणूचा प्रार्दुभाव आणि लॉकडाउनमुळे खगोल अभ्यासकांनी कोणतेही कार्यक्रम आयोजित केले नसले तरी अनेक खगोलप्रेमी घरूनच सुपरमूनचा आनंद घेणार आहेत.

वर्षातील हा पहिलाच सुपरमून आहे.या पौर्णिमेच्या चंद्राला पिंक मून म्हणत असले तरी त्याचा रंगाशी काही संबंध नाही. खगोल वैज्ञानिकांनी सुपरमूनसाठी प्रत्येक पौर्णिमेला वेगळा रंग दिला आहे, म्हणून पिंकमून म्हणून याची ओळख निश्चित केली आहे.

दुर्बिणीची गरज नाही

सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविताना मोठ्या आकाराचा दिसेल. हा सुपरमून पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही, परंतु दुर्बिणीला फिल्टर लावून त्यावरील विवर पाहता येतील. याशिवाय डिसीएलआर कॅमेऱ्यानेही त्याची छायाचित्रे टिपता येतील. अर्थात कोल्हापूरकरांचे नशीब जोरावर असेल तर हे विलोभनीय दृश्य अनुभवायला मिळणार आहे. यावेळेस चंद्र आकाराने मोठा आणि खूप तेजस्वी दिसणार असल्याने या खगोलीय घटनेचा अभ्यासकांनी आनंद घ्यावा.

Web Title: Super Pink Moon will be appealing today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.