पर्यवेक्षिका भोसले यांची खातेअंतर्गत चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:38+5:302021-06-04T04:18:38+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय गाजल्यानंतर अखेर महिला आणि बालकल्याण विभागाकडील भुदरगड येथील पर्यवेक्षिका रूपाली भोसले यांच्या ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय गाजल्यानंतर अखेर महिला आणि बालकल्याण विभागाकडील भुदरगड येथील पर्यवेक्षिका रूपाली भोसले यांच्या खातेअंतर्गत चौकशीची नोटीस देण्यात आली आहे.
गेल्यावर्षी याच तालुक्यातील पर्यवेक्षिका आशा पाटील आणि रूपाली भोसले यांनी एकमेकांविरोधी तक्रारी केल्या होत्या. सध्या पाटील या राधानगरी तालुक्यात कार्यरत आहेत. यानंतर माहिती अधिकार, निवेदने असे अनेक प्रकार झाले. यामध्ये भाेसले यांच्याकडून मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी झाल्या. यावर इचलकरंजी येथील नागरी बाल विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. याच्या अहवालामध्ये भोसले यांच्याकडून अनियमितता झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
किशाेरी प्रशिक्षणासाठी असलेले प्रतिकिशोरी २५० रुपये काही किशोरींना न देणे, प्रशिक्षणाच्या दरम्यान जेवणासाठी निधी मंजूर असताना त्याठिकाणी नाश्ता देणे, अशा तक्रारी त्यांच्याविरोधात आहेत. यावरून आता त्यांची खातेअंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.