स्टार ८३७ जिल्ह्यात कोव्हॅक्सिनपेक्षा कोविशिल्डचाच पुरवठा जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:56+5:302021-06-24T04:16:56+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचा विचार करता कोव्हॅक्सिन लसीपेक्षा कोविशिल्ड लसीचाच पुरवठा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. ...

The supply of covshield is higher than that of covacin in Star 837 district | स्टार ८३७ जिल्ह्यात कोव्हॅक्सिनपेक्षा कोविशिल्डचाच पुरवठा जास्त

स्टार ८३७ जिल्ह्यात कोव्हॅक्सिनपेक्षा कोविशिल्डचाच पुरवठा जास्त

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचा विचार करता कोव्हॅक्सिन लसीपेक्षा कोविशिल्ड लसीचाच पुरवठा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्यामुळेच साहजिकच कोविशिल्ड लस घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. आता खासगी रुग्णालयांत स्पुतनिक लसही उपलब्ध झाली आहे.

जिल्ह्यामध्ये १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिले दोन्ही महिने जिल्ह्यात केवळ आणि केवळ कोविशिल्ड लस पुरवठा केली जात होती. त्यामुळे हीच लस सर्वांना दिली गेली. २० मार्च ते २५ मार्च २०२१ या च कालावधीत मोठ्या संख्येने कोव्हॅक्सिन लस जिल्ह्यात उपलब्ध झाली. त्यामुळे या दोन्ही लसींची तुलना करता, या दोन्ही लसी प्रभावी असल्यातरी कोव्हॅक्सिनपेक्षा पाचपट कोविशिल्ड लस जिल्ह्याला प्राप्त झाली आहे.

चौकट

एकूण लसीकरण १२ लाख ८७ हजार ३४५

लसीच्या प्रकारानुसार पहिले आणि दुसरे डोस

संवर्ग कोविशिल्ड कोव्हॅक्सिन

पहिला डोस दुसरा डोस पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी ४४,१९३ ३१,११८ १,२०३ १,०८०

फ्रंटलाईन वर्कर्स ८२,१५४ २७,६१७ ३,८१८ ३,४७७

१८ ते ४४ वयोगट १७,५९८ ०० ६,६९२ ५,२७४

४५ ते ६० वयोगट ४,२८,३३३ ४२,५७३ ८,३६५ ६,९४२

६० वर्षांवरील ४,१०,२९९ १,१७,५५८ २६,२३७ २२,८१२

एकूण ९,८२,५७७ २,१८.८६६ ४६,३१५ ३९,५८५

चौकट

कोविशिल्डच का?

कोल्हापूर जिल्ह्यात सुरुवातीपासूनच शासनाकडून कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्यात आला. पहिल्यापासूनच लसीकरणामध्ये महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा अव्वल राहिला आहे. परंतु केवळ कोविशिल्ड लसीचाच पुरवठा सुरू राहिल्याने साहजिकच या लस घेणाऱ्यांची टक्केवारी अधिक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात केवळ हीच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने साहजिकच नागरिकांना हीच लस घ्यावी लागली. त्या तुलनेत कोव्हॅक्सिनचे प्रमाण कमी आहे.

कोट

शासकीय लसीकरणामध्ये कोणती लस हवी याचा पर्याय उपलब्ध नाही. तो खासगी रुग्णालयामध्ये सशुल्क उपलब्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अगदी पहिल्या दिवसापासून कोविशिल्ड लस देण्यात आली आहे. अल्प प्रमाणात कोव्हॅक्सिन लस मिळाली. त्यामुळे साहजिकच कोविशिल्ड लस घेणाऱ्यांची संख्या पाचपट जास्त आहे. मात्र हेच खासगी रुग्णालयात तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Web Title: The supply of covshield is higher than that of covacin in Star 837 district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.