घोडावत कोविड सेंटरला औषध पुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:44+5:302021-06-29T04:17:44+5:30
कोल्हापूर : घोडावत विद्यापीठातील कोविड सेंटरला तातडीने औषध पुरवठा करा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी मुख्य ...
कोल्हापूर : घोडावत विद्यापीठातील कोविड सेंटरला तातडीने औषध पुरवठा करा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे सोमवारी केली.
घोडावत कोविड सेंटरला गंभीर असलेले रुग्ण दाखल करून घेऊ नयेत अशा सूचना असल्याचे समजल्यानंतर अरुण इंगवले, प्रवीण यादव, विजय भोजे, प्रसाद खोबरे, राजेश पाटील यांनी चव्हाण यांची भेट घेतली. गंभीर रुग्ण दाखल करायचा नसेल तर मग दाखल कुठे करायचा ते सांगा, अशी भूमिका त्यांनी घेतली. या वेळी चव्हाण म्हणाले, घोडावत कोविड सेंटरला व्हेंटिलेटरपासून अन्य सुविधा नाहीत. गंभीर रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा त्याठिकाणी नाही, ही वस्तुस्थिती आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना पाठवून तेथील वस्तुस्थिती पाहून औषध पुरवठा केला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.