निकाल लागताच तोडली अडीच हजार ग्राहकांची वीज कनेक्शन; सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 12:06 PM2024-11-27T12:06:53+5:302024-11-27T12:07:37+5:30

कोल्हापूर : विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने कोल्हापूर परिमंडळामध्ये प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ...

Supply of electricity to 2342 non paying electricity consumers in Sangli and Kolhapur districts was temporarily cut off | निकाल लागताच तोडली अडीच हजार ग्राहकांची वीज कनेक्शन; सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणची कारवाई 

निकाल लागताच तोडली अडीच हजार ग्राहकांची वीज कनेक्शन; सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणची कारवाई 

कोल्हापूर : विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने कोल्हापूर परिमंडळामध्ये प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ४ लाख ९३ हजार ४१९ ग्राहकांकडे ७२ कोटी २४ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीच्या सूचना देण्यात आल्या असल्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील वीज बिल न भरणाऱ्या २३४२ वीज ग्राहकांचा पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अजून लोकांच्या अंगावर गुलाल आहे, तोपर्यंतच ही वसूली सुरू झाली आहे. वीज वापरली असल्याने त्याचे बिल वेळेत देणे ही ग्राहकांची जबाबदारीच आहे, परंतु निवडणूक असल्याने थकबाकी वसुलीची मोहीम सुरू नव्हती.

कोल्हापूर परिमंडळात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये सांगली जिल्ह्यात २ लाख ४३ हजार १२९ ग्राहकांकडे ३६ कोटी ७४ लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २ लाख ५० हजार २९० ग्राहकांकडे ३५ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजबिल वसूलीवरच महावितरणचा डोलारा अवलंबून असल्याने वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कोल्हापूर परिमंडळात नोव्हेंबर महिन्यात वीज बिल थकविणाऱ्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील १२३१ ग्राहकांचा समावेश असून, त्यांच्याकडे ६९ लाखांची थकबाकी होती, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ११११ ग्राहकांचा समावेश असून, त्यांच्याकडे ४२ लाखांची थकबाकी आहे. ग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कुणाकडे किती थकबाकी..

कोल्हापूर : २ लाख ५० हजार २९०
ग्राहक : ३५ कोटी ५० लाख
सांगली : २ लाख ४३ हजार १२९
ग्राहक : ३६ कोटी ७४ लाख

कुठूनही करा ऑनलाइन वीज बिल भरणा..

वीजग्राहकांना वेबसाइटवर, तसेच महावितरणच्या मोबाइल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो, या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.

Web Title: Supply of electricity to 2342 non paying electricity consumers in Sangli and Kolhapur districts was temporarily cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.