कार्यकर्त्यांचा आधारवड: सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:21 AM2021-04-12T04:21:19+5:302021-04-12T04:21:19+5:30
.......... कोणतेही मोठे कार्य कठोर मेहनत केल्यानेच पूर्ण होते. फक्त विचार केल्याने नव्हे, जसे की झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरीण ...
..........
कोणतेही मोठे कार्य कठोर मेहनत केल्यानेच पूर्ण होते. फक्त विचार केल्याने नव्हे, जसे की झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरीण स्वतःहून जात नाही. मोठे साम्राज्य, सत्तास्थाने फक्त मेहनतीने स्थापित होतात. त्यामुळे समाजकारण असो किंवा राजकारण त्यासाठी लागते ते फक्त नियोजन. निवडणूक असो की नियोजित कार्यक्रम असो वा एखादी नैसर्गिक आपत्ती असो नियोजनाच्याबाबतीत सतेज पाटील यांचा कोणी हात धरू शकत नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काय करायचं हे ठरलं की कसं करायचं याचा मार्ग सापडतो, त्याप्रमाणे सतेज पाटील हे आपल्या सर्व टीमला सोबत घेऊन आराखडा तयार करून प्रत्येकावरती जबाबदारी देत ते पूर्णत्वास नेतात. कोल्हापूर जिल्हावर आलेले महापुराचे संकट असो वा गतवर्षी संपूर्ण देशभर कोरोनाने घातले थैमान असो. कोणत्याही आपत्तीमध्ये बंटी पाटील जातीनिशी हजर राहून लक्ष घालून यंत्रणा कामाला लावतात. पंचगंगेचा महापूर असो किंवा कोरोनाच्या महामारीत स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात बसून आपत्तीग्रस्तांची सोयी लावण्यात व्यस्त होते. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते, त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते, याची प्रचिती जिल्ह्याने अनुभवली आहे.
क्रीडांगणांना नवसंजीवनी मिळणार
मळलेल्या वाटेने जाणारे अनेक जण असतात पण स्वतःची वाट निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व एखादेच असते. असे व्यक्तिमत्त्व म्हणजे नामदार सतेज पाटील होय. त्यांच्या रूपाने जिल्ह्याला एक कणखर विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व लाभले आहे. गावागावातील तरुण लष्करी भरती, पोलीस भरती होण्यासाठी व्यायामाचा सराव करण्यासाठी गावातील मुख्य रस्त्यावरून धावतात. जिथे जागा मिळेल तिथे व्यायाम करतात, ही खंत सतेज पाटील यांच्या मनात कित्येक दिवस सलत होती. त्यामुळे त्यांनी नागाव (ता.करवीर) येथील एका उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कोणतेही गाव क्रीडांगणाविना राहणार नाही, असे सांगून गाव तिथे क्रीडांगण ही संकल्पना जाहीर केली. सभेमध्ये केवळ पोकळ आश्वासने देऊन न थांबता दुसऱ्याच दिवसापासून कार्यकर्त्यांना सांगून प्रत्येक गावातील क्रीडांगणासाठी जागेचे प्रस्ताव देण्यासाठी सांगितले. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली. त्यामुळे मतदारसंघातील कित्येक गावातील तरुणांना क्रीडांगणासाठीचे प्रस्ताव तयार करून मार्गस्थ केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात गावोगावी भव्य असे क्रीडांगण उभारून गावातील तरुण-तरुणीसह शाळकरी विद्यार्थ्यांची सोय होऊन त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव मिळणार आहे. गिरगाव (ता. करवीर) येथे लोकवर्गणीतून साकारलेल्या क्रीडांगणाचे नामदार सतेज पाटील यांनी स्वतः एक लाख रुपयांची आर्थिक मदत ही देऊ केली आहे.
.........
असामान्य नेते
कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण एक हाती सांभाळणारे सर्वांचे लाडके ऊर्जावर्धक आणि आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील. साधारणत राजकीय व्यक्ती या एका सर्वमान्य धाटणीच्या असतात. परंतु बंटी साहेब यास अपवाद आहेत. एक मार्गदर्शक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहताना त्यांच्या अंगी असणारे विविध पैलू त्या अनुषंगाने अनेक विविध अनेक अनुभव गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
अशा असामान्य नेत्यास वाढदिनाच्या शुभेच्छा....
शब्दाकंन,संकलन: सागर शिंदे़, दिंडनेर्ली.