राष्ट्रवादी खाटीकसह सर्व समाजांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:23 AM2021-03-28T04:23:39+5:302021-03-28T04:23:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : खाटीक समाजाच्या सांस्कृतिक सभागृहाला राष्ट्रवादीने नगरपालिकेच्या सभेत कोणत्याही प्रकारचा विरोध केलेला नाही. त्यासाठीही आम्हीच ...

With the support of all communities, including the NCP killer | राष्ट्रवादी खाटीकसह सर्व समाजांच्या पाठीशी

राष्ट्रवादी खाटीकसह सर्व समाजांच्या पाठीशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

गडहिंग्लज : खाटीक समाजाच्या सांस्कृतिक सभागृहाला राष्ट्रवादीने नगरपालिकेच्या सभेत कोणत्याही प्रकारचा विरोध केलेला नाही. त्यासाठीही आम्हीच निधी उपलब्ध करून देणार आहोत. खाटीकसह राष्ट्रवादी पक्ष शहरातील सर्वच समाजांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते हारूण सय्यद यांनी दिली.

येथील राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनीच शहरातील विकासकामांसाठी १० कोटी रुपये, कुंभार समाजाच्या सभागृहासाठी २२ लाख रुपये तर मुस्लिम समाजासाठी १५ लाखांचा निधी दिला आहे. त्यामुळे त्याचे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये.

यावेळी नगरसेवक दीपक कुराडे, शुभदा पाटील, रेश्मा कांबळे, रूपाली परिट, शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गुंड्या पाटील, वसंत यमगेकर, किरण कदम, सुरेश कोळकी, आशपाक मकानदार, उदय परिट, ऊर्मिला जोशी आदी उपस्थित होते.

Web Title: With the support of all communities, including the NCP killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.