आमोद दंडगे यांच्याकडून कलाकारांना पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:19 AM2021-05-30T04:19:53+5:302021-05-30T04:19:53+5:30
कोल्हापूर कोविडच्या काळात कार्यक्रम बंद असल्यामुळे विविध प्रकारच्या कलाकारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण ...
कोल्हापूर कोविडच्या काळात कार्यक्रम बंद असल्यामुळे विविध प्रकारच्या कलाकारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कलापथक, ऑर्केस्ट्रा मध्ये काम करणारे वादक, गायक, तसेच वाघ्या-मुरळी, लोककलावंत यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर येथील प्रसिद्ध तबला वादक पं. आमोद दंडगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अडीचशे कलाकारांना एक महिना पुरेल इतके अन्न-धान्य प्रदान केले.
यासाठी त्यांना भारत, अमेरिका व सिंगापूर येथील त्यांच्या अनेक शिष्य व मित्रांनी सढळ हस्ते मदत केली. त्यांना या उपक्रमात कोल्हापुरातील भार्गव कांबळे, गुरू ढोले, संदेश खेडेकर, राजेंद्र लकडे, संदेश गावंदे व त्यांच्या कुटुंबीयांचे सहकार्य लाभले.
२९०५२०२१ कोल आमोद दंडगे
पंडित आमोद दंडगे यांच्या पुढाकारातून कलाकारांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.