भारत बंदला पेन्शनर संघटनेचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:20 AM2020-12-08T04:20:30+5:302020-12-08T04:20:30+5:30

वारणानगर : जुलमी शेतकरी कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी संघटनांनी आज, मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला देशपातळीवर खासगी क्षेत्रातील सेवानिवृत्त ...

Support of Bharat Bandla Pensioners Association | भारत बंदला पेन्शनर संघटनेचा पाठिंबा

भारत बंदला पेन्शनर संघटनेचा पाठिंबा

googlenewsNext

वारणानगर : जुलमी शेतकरी कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी संघटनांनी आज, मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला देशपातळीवर खासगी क्षेत्रातील सेवानिवृत्त कामगारांसाठी काम करणाऱ्या निवृत्त कर्मचारी ईपीएस ९५ राष्ट्रीय समन्वय समिती या पेन्शनर संघटनेने पाठिंबा दिल्याचे राष्ट्रीय सचिव प्रकाश पाठक यांनी जाहीर केल्याची माहिती समन्वयक दिलीप पाटील यांनी दिली.

नवीन कृषी कायद्यांचा तसेच कामगार कायद्यातसुद्धा ४ कोड बिल लागू करण्याचा केंद्र सरकारचा अट्टाहास का? हा प्रश्न आम्हा ६७.८ लाख ई.पी.एस. ९५ पेन्शनधारकांच्या बाबतीतसुद्धा केंद्र सरकारचा सतत २५ वर्षांपासून असून, कोणतीही सामाजिक सुधारणा न करता कोरोनासारख्या महामारीच्या काळातही जवळजवळ १.८० लाख पेन्शनधारक स्वर्गवासी झाले तरीसुद्धा कायद्यात दुरुस्ती न करण्याच्या सरकारच्या या नीतीचा निषेध म्हणून आजच्या भारत बंदला निवृत्त कर्मचारी १९९५ राष्ट्रीय समन्वय समितीचा देशभरात सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.

Web Title: Support of Bharat Bandla Pensioners Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.