इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनावरुन कोल्हापूरात वादंग; हिंदुत्ववादी आणि पुरोगामी संघटना आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 11:27 AM2020-02-28T11:27:27+5:302020-02-28T11:40:26+5:30
शिवाजी विद्यापीठातील शिवमहोत्सवात होणाऱ्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाला अंनिसने विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनीही पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. अंनिसचा विरोध मोडून काढण्याच्या निर्धाराने सर्व हिंदुत्ववादी संघटना सायंकाळी शिवाजी विद्यापीठात एकत्र येत आहेत.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील शिवमहोत्सवात होणाऱ्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाला अंनिसने विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनीही पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. अंनिसचा विरोध मोडून काढण्याच्या निर्धाराने सर्व हिंदुत्ववादी संघटना सायंकाळी शिवाजी विद्यापीठात एकत्र येत आहेत.
विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात होणाऱ्या या महोत्सवाचा प्रारंभ दुपारी चार वाजता होईल. कीर्तनकार इंदोरीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आणि व्यक्त केलेल्या दिलगिरीनंतर कोल्हापूरमध्ये अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आणि पुरोेगामी संघटनांनी विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांनीही कंबर कसली आहे.
या कीर्तनास अंनिस विरोध करणार असल्यामुळे सर्व हिंदुत्ववादी संघटना इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा देणार आहेत. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे आज सायंकाळी ५ वाजता विद्यापीठात मराठी राजभाषा या विषयावर कीर्तन होणार आहे.