कुंभी-कासारी कोविड केंद्र कोरोना रुग्णांसाठी आधारवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:18 AM2021-07-20T04:18:46+5:302021-07-20T04:18:46+5:30
कोरोना झालाय म्हणून भीती बाळगू नका, अशी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेला धीर यामुळे रुग्णांमध्ये कोरोना विरोधी लढण्याची प्रतिकारशक्ती ...
कोरोना झालाय म्हणून भीती बाळगू नका, अशी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेला धीर यामुळे
रुग्णांमध्ये कोरोना विरोधी लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण झाली.
नातेवाईकांपेक्षाही कोरोना रुग्णांना मिळणारी डॉक्टरांची सहानुभूती कुंभी कासारी येथील डी. सी. नरके विद्यानिकेतनमध्ये सुरू असलेल्या कोविड केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मिळत असल्याने येथे उपचार घेऊन जवळपास दीड ते दोन हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यात ४५ दिवसाच्या बाळापासून ९० वर्षांच्या आजोबांचा समावेश आहे.
कोरोना रुग्णांसाठी कुंभी-कासारी साखर कारखान्यावर शासकीय कोविड केंद्र उभारण्यात आले आहे. नरके विद्यानिकेतनमध्ये सुरू असणाऱ्या या कोविंड केंद्रात १५० बेड आहेत. यात ७० पुरुष व ६० महिलांसाठी बेेेड ठेवण्यात आले आहेत. २० बेड ऑक्सिजनची सोय करण्यात आली. दोन-अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या या कोविड केंद्रात कोरोना रूग्णांंवर संपूर्ण मोफत उपचार केले जातात.
सुसज्ज इमारती, स्वच्छ वातावरण,
निसर्ग्गसंपन्न परिसर व रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास डॉक्टर व आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. काय हवे, काय नको यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस. बी. राजदीप आपल्या २६ जणांच्या वैद्यकीय टीमसह योगदान देत आहेत. जिल्ह्यात करवीर तालुक्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. येथे पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येत असल्याने हे कोविड केंद्र नेहमी हाऊसफुल्ल आहे.
फोटो
कुंभी-कासारी कारखान्यावर असलेल्या कोविड केंद्रातील मोकळे वातावरण.