व्यवहार बंद ठेवून बाजार समितीचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:26 AM2021-09-27T04:26:19+5:302021-09-27T04:26:19+5:30
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज, सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने पाठिंबा दिला आहे. ...
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज, सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने पाठिंबा दिला आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय समितीच्या अशासकीय मंडळाने घेतला आहे.
केंद्र सरकारने केलेल्या नव्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्याला देशातील असंघटित कामगार, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह अनेक संघटनांनी उस्फूर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
नवीन तीन कायद्यांनी शेतकरी, अडते, व्यापारी व बाजार समितीवर अवलंबून असणारे सर्वच घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन भांडवलदारांचा फायदा होणार आहे. यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील सर्व घटक यामध्ये सहभागी होणार आहे. आज सकाळी ९ ते ११ या वेळेत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय अशासकीय मंडळाने घेतल्याची माहिती समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी पत्रकातून दिली.