समरजितसिंह घाटगे यांच्या पाठीशी

By admin | Published: May 26, 2015 01:07 AM2015-05-26T01:07:12+5:302015-05-26T01:07:33+5:30

हसन मुश्रीफ यांची ग्वाही : कागलमध्ये विविध विकासकामांचा प्रारंभ

To support Samarjitsinh Ghatge | समरजितसिंह घाटगे यांच्या पाठीशी

समरजितसिंह घाटगे यांच्या पाठीशी

Next

कागल : विक्रमसिंहराजेंच्या निधनामुळे आपल्या सर्वांचे पितृछत्र हरपले आहे. ही पोकळी भरून निघणारी नाही. राजे आयुष्यभर खऱ्या अर्थाने राजासारखेच जगले. कधीही, कोणतीही तडजोड केली नाही. राजेंनी उभे केलेले काम पुढे नेण्याची जबाबदारी समरजितसिंह यांच्यावर आहे. तुमच्या कोणत्याही संस्थेत मला अथवा आमच्या कार्यकर्त्यांना रस नाही. आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे राहू, असे उद्गार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी काढले.
कागल नगरपरिषदेच्या वतीने शहरातील ६५०० चाव्यांना मोफत पाणीमीटर जोडणे, ऐतिहासिक विठ्ठल मंदिरासमोर दीपस्तंभ व परिसर सुशोभीकरण करणे, अपंगांना साहित्य वाटप अशा संयुक्त कार्यक्रमांत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे होते. नगराध्यक्षा आशाकाकी माने, उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, बाळ पाटील, प्रकाश गाडेकर, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, शहरातील सर्व चावीधारकांना मोफत मीटर देणारी कागल नगरपरिषद राज्यात नव्हे, तर देशात एकमेव आहे. चाव्यांना मीटर बसविणे हे शासनाचेच धोरण आहे. घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचाही प्रारंभ लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत. अपंगांना न मागता दरवर्षी असे साहित्य नगरपालिकेने द्यावे.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, आपल्या भागात मुबलक पाणी उपलब्ध आहे. तरीही नगरपालिकेने चांगला निर्णय घेतला आहे. मोफत मीटर देत आहात, तर त्याच्या सुरक्षेच्याही उपाययोजना करा. या योजनेमुळे पाणी, वीज बचत होऊन नगरपालिकेला तसेच लोकांनाही फायदा होणार आहे. एका विशिष्ट वळणावर माझ्यावर चेअरमनपदाची जबाबदारी आली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ती पेलणार आहे. नगराध्यक्षा आशाकाकी माने यांनी स्वागत केले. रमेश माळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भैया माने, मनोहर पाटील यांचीही भाषणे झाली.

दीपावलीपूर्वी राममंदिर : घाटगे
समरजितसिंह घाटगे म्हणाले, अक्षरधामच्या धर्तीवर कागल शहरात उभे राहत असलेले राममंदिर हे विक्रमसिंहराजेंचे स्वप्न होते. त्यांचा चिरंजीव म्हणून नव्हे, तर त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या दीपावलीपूर्वी या राममंदिराचे उद्घाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्वांनी सहकार्य करावे.

Web Title: To support Samarjitsinh Ghatge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.