कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्याप्रबोधिनीकडून पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 07:31 PM2021-08-03T19:31:08+5:302021-08-03T19:35:18+5:30

Bjp Chandrkantdada Patil Kolhapur : यापुढच्या काळात उद्योगांना कुशल मनुष्यबळाची मोठी गरज भासणार आहे. त्यामुळेच विद्याप्रबोधिनीच्या माध्यमातून तरुणांना पाठबळ देणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Support from Vidya Prabodhini for creation of skilled manpower | कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्याप्रबोधिनीकडून पाठबळ

कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्याप्रबोधिनीकडून पाठबळ

Next
ठळक मुद्देकुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्याप्रबोधिनीकडून पाठबळभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

 कोल्हापूर : यापुढच्या काळात उद्योगांना कुशल मनुष्यबळाची मोठी गरज भासणार आहे. त्यामुळेच विद्याप्रबोधिनीच्या माध्यमातून तरुणांना पाठबळ देणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पाटील यांनी विद्याप्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिराला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी पाटील बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पदवीधरांना शिक्षणासोबत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रशिक्षण वर्गासाठी सहकार्य करणारे भाजपा उद्योग आघाडीचे संयोजक अनंत पेंडसे, प्रशिक्षक गुरव यांनी या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. समन्वयक विजयसिंह पाटील यांनी आभार मानले. यावेळी जयदीप मोरे, शंतनु मोहिते, सचिन साळोखे, कृष्णात आतवाडकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

 

Web Title: Support from Vidya Prabodhini for creation of skilled manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.