‘आमचं निस्तारायला आमचा साहेब घट्ट हाय’; कोल्हापुरात सतेज पाटील समर्थकांची बॅनरबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 12:29 PM2024-11-29T12:29:14+5:302024-11-29T12:31:18+5:30

कोल्हापूर : ‘निष्ठेशी तडजोड नाही, आमचं निस्तारायला आमचा साहेब घट्ट हाय’, असे बॅनर कसबा बावड्यासह साऱ्या शहरभर लावत काँग्रेसचे ...

Supporters of MLA Satej Patil held banners in the city after the assembly result | ‘आमचं निस्तारायला आमचा साहेब घट्ट हाय’; कोल्हापुरात सतेज पाटील समर्थकांची बॅनरबाजी

‘आमचं निस्तारायला आमचा साहेब घट्ट हाय’; कोल्हापुरात सतेज पाटील समर्थकांची बॅनरबाजी

कोल्हापूर : ‘निष्ठेशी तडजोड नाही, आमचं निस्तारायला आमचा साहेब घट्ट हाय’, असे बॅनर कसबा बावड्यासह साऱ्या शहरभर लावत काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनी पराभवातून खचून जाणार नसल्याचा संदेश दिला आहे. बावड्यातील रेणुका मंदिरापासून ते श्रीराम पेट्रोलपंपापर्यंत ठिकठिकाणी वेगवेगळ्या आशय असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. असेच फलक दाभोळकर कॉर्नरपासून अगदी संभाजीनगर कळंब्यापर्यंत लागले आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यात कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराचाही पराभव झाला. महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर व अमल महाडिक यांच्या अभिनंदनाचे बॅनर ठिकठिकाणी लागले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून सतेज पाटील यांच्या समर्थकांनी आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांचे बॅनर लावत पराभवाने हिम्मत हरली नसल्याचा संदेश दिला आहे. 

'गुलालाचाच विषय हाय न्हवं, थोडे दिवस थांबा लवकरच घरपोच होईल' हरलो तरी मैदान सोडलेले नाही..वेळ कोणती पण असुदेत, काल पण, आज पण, उद्या पण सदैव तुमच्यासोबतच..पडत्या काळात साथ सोडणारी आमची औलाद नाही..कायम एकनिष्ठ..असे आव्हानात्मक मजकूर असलेल्या बॅनरमधून त्यांनी महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये या पराभावाची परतफेड करणार असल्याचा इशारा दिला आहे. खेळ अजून संपलेला नाही, खरा खेळ तर आता सुरू झाला आहे. तू चाल पुढे तुला रं गड्या भीती कशाची, यासह विविध आशय असलेले बॅनर सगळीकडे झळकले आहेत.

Web Title: Supporters of MLA Satej Patil held banners in the city after the assembly result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.