GokulMilk Kolhapur : महाडिकांचा शब्द घेऊन राजू शेट्टींचा सत्तारूढ आघाडीला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 02:13 PM2021-04-28T14:13:14+5:302021-04-28T14:41:09+5:30

GokulMilk Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मल्टीस्टेट करणार नाही, असा शब्द सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून घेउन माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी संघाच्या निवडणुकीत सत्तारुढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला.

Supporting Shetty's ruling front by taking Mahadik's word | GokulMilk Kolhapur : महाडिकांचा शब्द घेऊन राजू शेट्टींचा सत्तारूढ आघाडीला पाठिंबा

GokulMilk Kolhapur : महाडिकांचा शब्द घेऊन राजू शेट्टींचा सत्तारूढ आघाडीला पाठिंबा

Next
ठळक मुद्देमहाडिकांचा शब्द घेऊन शेट्टींचा सत्तारूढ आघाडीला पाठिंबागोकुळचे रणांगण ,कोल्हापुरात घोषणा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मल्टीस्टेट करणार नाही, असा शब्द सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून घेउन माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी संघाच्या निवडणुकीत सत्तारुढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला.

शेट्टी सध्या राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीसोबत आहेत, मात्र, गोकुळसाठी विरोधी आघाडीमध्ये महाविकास आघाडीचे सदस्य असताना त्यांनी ही भूमिका घेतल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. शेट्टी तसेच अशोक चराटी यांनी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा दिल्याची घोषणा आज, कोल्हापूरात पत्रकार बैठकीत आघाडीच्या नेत्यांनी केली.

ह्यगोकुळह्ण दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ येथे भेट घेतली होती. सत्तारूढ आघाडीला पाठिंबा देण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर शेट्टी यांनी पाठिंब्याबाबत अनुकूलता दर्शविली. याबाबतची अधिकृत घोषणा आज, बुधवारी त्यांनी कोल्हापुरात केली आहे.

गोकुळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली विरोधी आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे राजू शेट्टी हेही त्यांच्यासोबत राहतील, असे वाटत होते. मात्र, पॅनल बांधणीसह इतर घडामोडींमध्ये त्यांचा फारसा संपर्क राहिला नाही, उलट शेट्टी यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याचवेळी शेट्टी यांची ह्यगोकुळह्ण निवडणुकीतील भूमिकेची दिशा स्पष्ट झाली होती.

या पार्श्वभूमीवर धनंजय महाडिक यांनी शेट्टी यांची शिरोळ येथे भेट घेतली. भेटीदरम्यान मल्टीस्टेटचा रद्द केलेला ठराव, कोरोना काळात दूध उत्पादकांना झालेली मदत आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर सत्तारूढ गटाला पाठिंब्याबाबत शेट्टी यांनी अनुकूलता दर्शविली.

आज, कोल्हापुरात आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. बैठकीला सावकार मादनाईक, प्रा. जालिंदर पाटील, सागर शंभूशेटे, बंडू पाटील, डॉ. महावीर अकोळे, स्वस्तिक पाटील, आदिनाथ हेमगिरे, मिलिंद साखरपे, शैलेश आडके, नगरसेवक शीतल गतारे, बजरंग खामकर आदी उपस्थित होते.


सत्ताधारी आघाडीला पाठिंबा द्या, अशी विनंती धनंजय महाडिक यांनी आपल्याला भेटून केली आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला आहे.
- राजू शेट्टी,
नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Supporting Shetty's ruling front by taking Mahadik's word

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.