सुप्रियाने पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षेत मारली बाजी, अवघ्या २३ व्या वर्षी होणार प्रशासकीय अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 05:15 PM2023-03-02T17:15:42+5:302023-03-02T17:17:14+5:30

कोणताही खासगी क्लास न लावता घरातच अभ्यास करीत अहोरात्र मेहनत घेत संपादन केले यश

Supriya Shivaji Shinde passed the MPSC exam in the first attempt. He will become an administrative officer at the age of 23 | सुप्रियाने पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षेत मारली बाजी, अवघ्या २३ व्या वर्षी होणार प्रशासकीय अधिकारी

सुप्रियाने पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षेत मारली बाजी, अवघ्या २३ व्या वर्षी होणार प्रशासकीय अधिकारी

googlenewsNext

रविंद्र पोवार

कोडोली: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग १ च्या विविध पदांसाठी घेणेत आलेल्या परीक्षेमध्ये केखले (ता पन्हाळा ) येथील सुप्रिया शिवाजी शिंदे यांनी प्रथम प्रयत्नातच यश संपादन केले. गावात पहिल्या महिला अधिकारी होण्याचा मान ही त्यांनी मिळविला आहे. 

जोतिबाच्या पायथ्याशी केखले गाव वसले आहे. गावात शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसताना प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर सुप्रिया यांनी अभ्यासात सातत्य राखत पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले. गावातच प्राथमिक शिक्षण घेतले तर माध्यमिक शिक्षण कोडोली येथे झाले. १२ वी नंतर पुणे येथील कृर्षी महाविद्यालयातून कृर्षी विभागाची पदवी प्राप्त केली. 

वडील शिवाजी हे आर्मी मधून शिपाई म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. आपली मुलगी प्रशासकिय सेवेत असावी अशी त्याची इच्छा होती. शासकिय सेवेत दाखल होणेसाठी तिने शालेय जीवनापासून दृढ निर्णय घेतला होता. पदवी चे शिक्षण घेत असतानाच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली होती. कोणताही खासगी क्लास न लावता घरातच अभ्यास करीत अहोरात्र मेहनत घेत त्यांनी हे यश संपादन केले. तिला शिक्षक, आई, वडील यांची मोलाची साथ मिळाली. तिच्या यशामुळे परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Web Title: Supriya Shivaji Shinde passed the MPSC exam in the first attempt. He will become an administrative officer at the age of 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.