शिवाजी विद्यापीठ निवडणूक: ‘सिनेट’चा पहिला निकाल जाहीर, पदव्युत्तर शिक्षक गटात ‘सुप्टा’ची बाजी

By संतोष.मिठारी | Published: November 16, 2022 02:05 PM2022-11-16T14:05:25+5:302022-11-16T14:06:05+5:30

विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) यांच्यात चुरस

Supta's victory in post-graduate teacher group in Shivaji University Senate election | शिवाजी विद्यापीठ निवडणूक: ‘सिनेट’चा पहिला निकाल जाहीर, पदव्युत्तर शिक्षक गटात ‘सुप्टा’ची बाजी

शिवाजी विद्यापीठ निवडणूक: ‘सिनेट’चा पहिला निकाल जाहीर, पदव्युत्तर शिक्षक गटात ‘सुप्टा’ची बाजी

Next

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) आणि विद्यापरिषद, अभ्यासमंडळे, आदी अधिकार मंडळांच्या निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया आज, बुधवार सकाळी नऊ वाजता विद्यापीठातील परीक्षा भवन क्रमांक दोनमध्ये सुरू झाली. पहिल्यांदा मतदारसंख्या कमी असलेल्या विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक गटातील मतमोजणी पूर्ण झाली. यात शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनेच्या (सुप्टा) उमेदवारांनी तीन जागांवर बाजी मारली.

विजयी उमेदवारांमध्ये डॉ. शशीभूषण महाडिक (संख्याशास्त्र), शंकर हंगीरगेकर (रसायनशास्त्र), माधुरी वाळवेकर (प्राणीशास्त्र) यांचा समावेश आहे. या उमेदवारांनी विजयानंतर विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

विविध नऊ अभ्यास मंडळांवरील २७ जागांसाठी ४६ उमेदवारांमध्ये लढत झाली. त्यात विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) यांच्यात चुरस रंगली. विकास आघाडीने १४ जागांसह बाजी मारली. ‘सुटा’ला १३ जागा मिळाल्या. विकास आघाडीला इंग्रजी, हिंदी अभ्यासमंडळात प्रत्येकी एक, मानसशास्त्रमध्ये तीन तर ‘सुटा’ला हिंदी इंग्रजी, रसायनशास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र, प्राणीशास्त्रमध्ये दोन आणि अर्थशास्त्रमध्ये १ जागा मिळाली. अभ्यासमंडळाच्या गटानंतर आता अधिसभा-शिक्षक, विद्यापरिषद शिक्षक, नोंदणीकृत पदवीधर या गटांतील मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे.

Web Title: Supta's victory in post-graduate teacher group in Shivaji University Senate election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.