‘मेहता आणि कंपनी’चे सुरेश मेहता यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:51+5:302021-06-22T04:17:51+5:30
गेल्या दोन आठवड्यांपूर्वी कोरोनावर मात करून सुरेश मेहता घरी आले होते. त्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने त्यांना गुरुवारी ...
गेल्या दोन आठवड्यांपूर्वी कोरोनावर मात करून सुरेश मेहता घरी आले होते. त्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने त्यांना गुरुवारी (दि. १७) उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांनी सोमवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास अखेरचा श्र्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मेहता यांचे मूळ गाव खस्ता, भावनगर (गुजरात) असून, आजोबा हरिचंद हे स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्य लढ्यासाठी वृत्तपत्र छपाईसह अन्य कारणांसाठी लागणाऱ्या कागदासाठी त्यांनी कोल्हापुरात मेहता आणि कंपनी सुरू केली. त्यांचा व्यवसाय वडिलांबरोबर सुरेश यांनी पुढे चालविला. व्यवसायाबरोबर ते सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते. त्यांचा आयुर्वेदावर विश्वास होता. त्यांनी वडिलांच्या नावाने हरिचंद मेहता पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. त्याद्वारे वनौषधींची राज्यभर प्रदर्शने भरविली. या ट्रस्टद्वारे गरजू-गरिबांना वैद्यकीय उपचारासाठी मदतीचा हात दिला. बालकल्याण संकुल, रेडक्रॉस, आदी सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत होते. त्यांचा उठमणू विधी आज, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
फोटो (२१०६२०२१-कोल-सुरेश मेहता (निधन)