सर्फनाला धरणग्रस्तांनी मोजणीचे काम पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:41 AM2021-02-18T04:41:03+5:302021-02-18T04:41:03+5:30
* मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार आजरा : आजरा तालुक्यातील सर्फनाला धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत शिल्लक प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाहीत. ...
* मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार
आजरा :
आजरा तालुक्यातील सर्फनाला धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत शिल्लक प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाहीत. तोपर्यंत धरणाच्या बुडीत क्षेत्रातील घरांच्या मोजणीस धरणग्रस्तांचा विरोध असेल असे पत्र सर्फनाला धरणग्रस्तांनी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी देत मोजणीचे काम बंद पाडले. धरणग्रस्तांनी मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांवर पुनर्वसनाबाबतच्या प्रश्नांचा भडिमार केला. सर्फनाला धरणग्रस्तांना लाक्षक्षेत्रात मिळालेल्या जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी मशीन मिळावी, २८ -अ खालील प्रकरणांचे स्पष्टीकरण द्यावे, वाढीव गावठाणचा प्रस्ताव मिळावा, संकलन दुरुस्ती करून स्वेच्छा अनुदान मिळावे, निर्वाह क्षेत्रापेक्षा जादा जमिनी असलेल्या खातेदारांना देय जमीन नाकारली आहे त्याचा अहवाल त्वरित मिळावा. या धरणग्रस्तांच्या मागण्या तातडीने मार्गस्थ लागाव्यात, अन्यथ: बुडीत क्षेत्रातील घरांच्या मोजणीस धरणग्रस्तांचा विरोध असेल अशा प्रकारचे पत्र मंगळवारी धरणग्रस्तांनी तहसीलदार यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना दिले होते. मोजणीला विरोधाचे पत्र देऊनही मोजणीस गेलेले पाटबंधारे विभागाचे अधिकारी शरद पाटील, मोजणी खात्याचे नितीन पाटील यासह अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. अखेर घटनास्थळाचा पंचनामा करून अधिकाऱ्यांनी मोजणीचे काम थांबविले.
धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश मिटके, उपाध्यक्ष तुकाराम गुंजाळ, अशोक मालव, संदीप मिटके, अर्जुन शेटगे, संतोष पाटील, प्रकाश शेटगे यासह मोठ्या संख्येने धरणग्रस्त सहभागी झाले होते.
-------------------------------
* गावठाण व शिरकेवाडीतील मिळकती मोजणीस विरोध पारपोलीपैकी गावठाण व शिरकेवाडीतील २५० मिळकती बुडीत क्षेत्रातील आहेत. त्यांची मोजणी करण्यास बुधवारी अधिकारी आपल्या लवाजम्यासह गेले होते. धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागलेले नसताना बुडीत क्षेत्रातील मिळकतींची मोजणी कशासाठी असा सवाल करीत धरणग्रस्तांनी मोजणीचे काम बंद पाडले.
----------------------------------
* फोटो ओळी : १) सर्फनाला प्रकल्पस्थळावर अधिकाऱ्यांना घेराव घालून मोजणीचे काम बंद पाडताना धरणग्रस्त.
क्रमांक : १७०२२०२१-गड-०७ २) मोजणीचे काम बंद पाडण्यासाठी जमा झालेले धरणग्रस्त.
क्रमांक : १७०२२०२१-गड-०६