कोल्हापूर शहरातील एक लाख घरांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 11:11 AM2020-04-16T11:11:04+5:302020-04-16T11:12:22+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत एक लाख १ हजार ७३ घरांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये ...
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत एक लाख १ हजार ७३ घरांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये चार लाख ३७ हजार १८३ नागरिकांची तपासणी केली आहे. १८ मार्चपासून ११ नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचाऱ्यांमार्फत हा सर्व्हे करण्यात आला आहे.
‘कोरोना व्हायरस’च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत युद्धपातळीवर यंत्रणा राबत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपासून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. मंगळवारी एकूण ५ हजार १५० घरांचे सर्वेक्षण केले असून, यामध्ये २२ हजार ८१६ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
सर्वेक्षण केलेला परिसर
कसबा बावड्यातील मराठा कॉलनी, इंदिरानगर, घोरपडे गल्ली, भक्तिपूजानगर, गजानन महाराजनगर, पद्माळा, मंगेशकरनगर, वारे वसाहत, जवाहरनगर, मंगळवार पेठ, ज्योतिर्लिंग कॉलनी, गजानन कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, जागृतीनगर, शास्त्रीनगर, यादवनगर, शाहू मिल कॉलनी, शाहूपुरी, रामानंदनगर, जरगनगर, सुभाषनगर, वर्षानगर, एस.एस.सी.बोर्ड, राजेंद्रनगर, बालाजी पार्क, हॉकी स्टेडियम, साळोखे पार्क, नेहरुनगर, नंदनवन कॉलनी, पोतदार स्कूल, अमृत विकास सोसायटी, विक्रमनगर, शाहू कॉलनी, टेंबलाईवाडी, लक्ष्मी कॉलनी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, बाजारगेट, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, तोरस्कर चौक, पंचगंगा तालीम, दुधाळी, रंकाळा स्टँड परिसर, सिद्धार्थनगर, राजेबागस्वार दर्गा, न्यू शाहूपुरी, आदी ठिकाणी हा सर्व्हे करण्यात आला.