सूर्यकांत मांडरे यांचा अनमोल ठेवा शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 06:25 PM2018-11-01T18:25:50+5:302018-11-01T18:28:59+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते व चित्रकार सूर्यकांत मांडरे यांनी रेखाटलेली चित्रे, शिल्प त्यांनी साकारलेल्या भूमिकांची छायाचित्रे, मिळालेले पुरस्कार, पुस्तके असा त्यांचा ठेवा स्वरूपा मांढरे - पोरे यांनी गुरुवारी शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द केला. अभिनयाबरोबरच चंद्रकांत मांडरे यांनी रेखाटलेली चित्रे, शिल्प, विविध चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका, व्यक्तिरेखा व प्रसंगांची छायाचित्रे, पुरस्कार, त्यांनी लिहिलेली पुस्तके हा सगळा ठेवाच यामध्ये आहे.
कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते व चित्रकार सूर्यकांत मांडरे यांनी रेखाटलेली चित्रे, शिल्प त्यांनी साकारलेल्या भूमिकांची छायाचित्रे, मिळालेले पुरस्कार, पुस्तके असा त्यांचा ठेवा स्वरूपा मांढरे - पोरे यांनी गुरुवारी शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द केला. अभिनयाबरोबरच चंद्रकांत मांडरे यांनी रेखाटलेली चित्रे, शिल्प, विविध चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका, व्यक्तिरेखा व प्रसंगांची छायाचित्रे, पुरस्कार, त्यांनी लिहिलेली पुस्तके हा सगळा ठेवाच यामध्ये आहे.
पुणे महापालिकेच्या अखत्यारितामधील आबा बाबुल उद्यानातील पं. भीमसेन जोशी संग्रहालयात या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या; मात्र हे साहित्य काही वर्षांपूर्वी पुणे महापालिकेने काढून ठेवले होते. ही बाब कळल्यानंतर मांडरे यांच्या पत्नी सुशीला मांडरे व नात स्वरूपा पोरे यांनी हे साहित्य परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते; त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
हा ठेवा शिवाजी विद्यापीठाला देण्यासाठी स्वरूपा पोरे यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी हा ठेवा संग्रहालयात ठेवण्याचे मान्य केले. त्यानुसार त्यांनी पुणे महापालिकेने मंगळवारी हे साहित्य सूर्यकांत मांडरे यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. हे साहित्य बुधवारी सायंक ाळी उशिरा ट्रकद्वारे शिवाजी विद्यापीठात दाखल झाले; गुरुवारी स्वरूपा मांढरे - पोरे यांनी हे साहित्य विद्यापीठ प्रशासनाकडे सुपूर्द केले.
शिवाजी विद्यापीठातील संग्रहाचे काम सध्या सुरू आहे. हे संग्रहाचे काम पूर्ण होताच चंद्रकांत मांडरे यांच्यावर अभ्यास करून या साहित्यांची मांडणी या ठिकाणी केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
माझ्या आजोबाचा हा अनमोल ठेवा यापुढे शिवाजी विद्यापीठातील संग्रहात जतन केला जाणार आहे. याचे मला व माझ्या आजीला यांचे समाधान वाटते, हे साहित्य जसेच्या तसे आम्हाला पुणे महानगर पालिकेचे महापौर मुक्ता टिळक, आयुक्त सौरभ राव यांनी परत देण्यासाठी विशेष मदत केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहे.
- स्वरूपा मांढरे - पोरे