Kolhapur: विधानसभेला नेत्याला यश मिळो; सांगरुळ ते अंबाबाई मंदिर १८ कि.मी. अनवाणी पायाने घातला दंडवत

By राजाराम लोंढे | Published: October 4, 2024 07:00 PM2024-10-04T19:00:33+5:302024-10-04T19:03:54+5:30

सकाळी साडे आठ वाजता शंभर-दीडशे कार्यकर्त्यांंना सोबत घेऊन दंडवत यात्रा सुरु केली

Sushant Nale walked 18 km barefoot from Sangrul to Ambabai temple for his leader's success in the assembly elections | Kolhapur: विधानसभेला नेत्याला यश मिळो; सांगरुळ ते अंबाबाई मंदिर १८ कि.मी. अनवाणी पायाने घातला दंडवत

Kolhapur: विधानसभेला नेत्याला यश मिळो; सांगरुळ ते अंबाबाई मंदिर १८ कि.मी. अनवाणी पायाने घातला दंडवत

कोल्हापूर : सांगरुळचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुशांत नाळे यांनी शुक्रवारी सांगरुळ ते अंबाबाई मंदिर अनवाणी पायाने तब्बल १८ किलो मीटर दंडवत घातला. सायंकाळी साडे पाच वाजता पदयात्रा अंबाबाई मंदिर येथे आल्याने त्यानंतर त्यांनी ओटी अर्पण करुन विधानसभा निवडणूकीत आपल्या नेत्याला यश देण्याचे त्यांनी साकडं घातले.

सुशांत नाळे तसा पैलवान गडी, पण मैत्रीसाठी काय पण करायची त्यांची तयारी असते. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या नेत्याला यश मिळावे करवीर निवासिनी अंबाबाईला अनवाणी पायाने दंडवत घालण्याचे नवस केले. विशेष म्हणजे त्यांचे नऊ दिवस उपवास असतो, अशा स्थितीत अनवाणी पायाने बुधवारी सकाळी साडे आठ वाजता शंभर-दीडशे कार्यकर्त्यांंना सोबत घेऊन सांगरुळ पासून दंडवत यात्रा सुरु केली. कुडित्रे साखर कारखाना, वाकरे फाटा, दोनवडे, साबळेवाडी फाटा येते महिलांनी त्यांचे औक्षण केले. सायंकाळी साडे चार वाजता रंकाळा टॉवर येथे दंडवत यात्रा आल्यानंतर खास सोलापूरी हलगीच्या निनादात व पाचशेहून अधिक समर्थकांसोबत रंकाळा स्टॅड मार्गे अंबाबाई मंदिरात नाळे आले.

दरम्यान, अंबाबाई मंदिरात आल्यानंतर माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘गोकुळ’ संचालक अजित नरके, देवराज नरके, ‘कुंभी’चे उपाध्यक्ष राहुल खाडे, माजी उपाध्यक्ष निवास वातकर, कुंभी बँकेचे संचालक प्रदीप नाळे, राजाराम खाडे, शुभम खाडे, संभाजी नाळे, आदी उपस्थित होते.

Web Title: Sushant Nale walked 18 km barefoot from Sangrul to Ambabai temple for his leader's success in the assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.