सुशील पाटील यांचे सामाजिक काम कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:24 AM2021-04-07T04:24:26+5:302021-04-07T04:24:26+5:30
समाजातील रंजल्या गांजलेल्या लोकांचे अश्रू पुसून त्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचा प्रयत्न सुशील पाटील कौलवकर करत आहेत. शंकरराव पाटील यांचे ...
समाजातील रंजल्या गांजलेल्या लोकांचे अश्रू पुसून त्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचा प्रयत्न सुशील पाटील कौलवकर करत आहेत. शंकरराव पाटील यांचे ते खरोखर वैचारिक वारसदार असल्याचे प्रतिपादन भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांनी केले.
कौलव (ता. राधानगरी) येथे सुशील शंकराव पाटील (कौलवकर) युवा मंच व कै. शंकराव पाटील (कौलवकर) चॅरिटेबल ट्रस्ट, प्रकाश हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर रुग्णालय, इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले.
चरापले पुढे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात सुशील पाटील यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या त्यागी वृत्तीमुळे ते लोकाभिमुख होत आहेत. भोगावतीचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील कौलवकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी २५६ जणांची तपासणी करण्यात आली. यावेळी सुशील पाटील कौलवकर, रणजीतसिंह पाटील कौलवकर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय पाटील, सरपंच सविता चरापले, दीपकराव चरापले, ग्रा. पं. सदस्य डी. जी. पाटील, मधुकर पाटील, पोलीस पाटील दत्तात्रय कांबळे, अजित पाटील, नितीन पाटील, नामदेव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.
फोटो ओळी :
कौलव, ता. राधानगरी येथे सुशील पाटील कौलवकर युवा मंच यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना सदाशिवराव चरापले, यावेळी सुशील पाटील, विजय पाटील, सरपंच सविता चरापले व मान्यवर.