सांबराच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या तरुणास अटक

By admin | Published: June 22, 2014 12:36 AM2014-06-22T00:36:00+5:302014-06-22T00:48:54+5:30

तीन दिवसांची पोलीस कोठडी

The suspect arrested in Samba's horn | सांबराच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या तरुणास अटक

सांबराच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या तरुणास अटक

Next

कोल्हापूर : सांबर या वन्य प्राण्याचे शिंग तस्करी करणाऱ्या तरुणास लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी हेमंत साताप्पा तांबेकर (वय ३२, रा. केसरकर गल्ली, लक्षतीर्थ वसाहत) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ४० हजार किमतीचे सांबराचे शिंग जप्त केले. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, लक्षतीर्थ वसाहत येथील न्यू एकता ग्रुपजवळील केसरकर गल्लीमध्ये राहणाऱ्या हेमंत तांबेकर यांच्याकडे सांबराचे शिंग असल्याचे खबऱ्याकडून पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पांचाळ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज दुपारी दीडच्या सुमारास घरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता सांबराचे शिंग मिळून आले. ते कोठून आणले. कोणाला विक्री करणार होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. तांबेकर हा मूळचा पणुत्रे (ता. पन्हाळा) येथील आहे. त्यामुळे आणखी काही तस्करीबहाद्दरांचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The suspect arrested in Samba's horn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.