मदतीच्या बहाण्याने चोरट्यांची टोळी फिरत असल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:16 AM2021-07-24T04:16:25+5:302021-07-24T04:16:25+5:30
कोल्हापूर : महापुरामुळे शहरातील स्थलांतरित कुटुंबीयांच्या घरी चोरीचे प्रकार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवली आहे. त्याशिवाय काही युवकांची ...
कोल्हापूर : महापुरामुळे शहरातील स्थलांतरित कुटुंबीयांच्या घरी चोरीचे प्रकार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवली आहे. त्याशिवाय काही युवकांची टोळकी पुराच्या पाण्यात मदतीचा बहाणा करत स्थलांतरितच्या नावाखाली साहित्यांची चोरी करत असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. अशा बाबी आढळल्यास त्वरित शेजारील पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने केले आहे.
ज्या भागात महापुराचे पाणी शिरले आहे, त्या भागातील रहिवासी स्थलांतरित केले आहेत. अशा भागात चोरीच्या शक्यतेने पोलिसांची गस्त वाढवली आहे. शहरात स्थलांतरित करण्याचे पथक किंवा मदतकार्याचा बहाणा करून काही युवकांची टोळकी बोट अथवा तराफा घेऊन फिरत असल्याचे पोलीस दलाला माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडून चोरीचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अशा संशयित टोळी फिरताना आढळल्यास नागरिकांनी शेजारील पोलीस ठाणे अथवा ०२३१-२६६२३३३, २६०१९५०,५२,५३ तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग नं. ०२३१-२६६५६१७ या फोेन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.