संशयित प्रीतमच्या घरावर हल्ला

By admin | Published: March 4, 2017 01:15 AM2017-03-04T01:15:23+5:302017-03-04T01:15:23+5:30

प्रापंचिक साहित्याची तोडफोड : कार्यकर्ते संतप्त, परिसरात तणाव, बंदोबस्त

Suspected Pritam's house attacked | संशयित प्रीतमच्या घरावर हल्ला

संशयित प्रीतमच्या घरावर हल्ला

Next

कोल्हापूर : महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांची हत्या झाल्याचे समजताच सुमारे चारशेपेक्षा जास्त आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजेंद्रनगर येथील निवासस्थानी गर्दी केली. संशयित प्रीतम पाटील याचे घर शेजारीच आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी त्याच्या घरावर दगडफेक करत प्रापंचिक साहित्यासह कारची तोडफोड केली. यावेळी प्रीतमची आई, पत्नी व लहान मुलाला जीव मुठीत घेऊन पळावे लागले. या घटनेमुळे परिसरात तणाव पसरला.
डॉ. किरवले यांचा हत्या कोणत्या कारणातून झाला हे लवकर स्पष्ट न झाल्याने कार्यकर्ते भांबावून गेले. पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी किरवले यांच्या बंगल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून आत कोणालाच सोडले नाही. रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांची भेट घेऊन माहिती घेतली असता शेजारीच राहणाऱ्या प्रीतम गणपती पाटील याने पैशांच्या वादातून हत्या केल्याचे सांगण्यात आले. ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळी रक्ताचे नमुने घेतले. शहरातील चारही पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.
प्रसारमाध्यमांशी बोलतांना पोलिस उपअधीक्षक हर्ष पोद्दार यांनी डॉ. कृष्णा किरवले यांचा खून वैयक्तिक कारणातून झाल्याचे पुढे येत आहे. त्यामध्ये सामाजिक हेतू दिसत नसला तरी सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे स्पष्ट केले. त्यावर दलित कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन ‘सामाजिक हेतू दिसत नाही, असे तुम्ही बोलताच कसे,’ म्हणून त्यांच्याशी वाद घालत घेराओ घातला. सुमारे अर्धा तास पोद्दार यांना अडवून ठेवले. अखेर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. डॉ. किरवले यांच्या हत्यामागचे सर्व पैलू तपासले जातील. त्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास सोपविण्यात आला आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य केल्यास योग्य दिशेने तपास करू, असा विश्वास देऊन कार्यकर्त्यांना शांत केले.
दरम्यान, संशयीत पाटील याचे घर किरवले यांच्या घराशेजारीच आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी त्याच्या घरावर दगडफेक करत प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. यावेळी घरामध्ये आरोपीची आई, पत्नी व लहान मुल होते. या तिघांनाही जीव मुठीत घेऊन बाहेर पळावे लागले. त्यानंतर पोलिसांनी घरासभोवती पोलिस बंदोबस्त ठेवला. (प्रतिनिधी)+


संशयिताकडून वसुलीचे काम
संशयित प्रीतम पाटील हा वडिलांना सुतारकामात मदत करत असे. राजेंद्रनगर परिसरातील तरुणांच्यात त्याची नेहमी ऊठबस असायची. वडिलांनी केलेल्या कामाची तो वसुली करत असे. डॉ. किरवले यांच्याकडे त्याने पैशांसाठी तगादा लावला होता. ते पैसे देत नाहीत, याची खात्री झाल्यानंतर त्याने खुन केला.

Web Title: Suspected Pritam's house attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.