संशयितांना कडक शिक्षा करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:39 AM2020-12-12T04:39:58+5:302020-12-12T04:39:58+5:30
इचलकरंजी : भोजे मळ्यातील यंत्रमाग कारखान्यात घुसून तोडफोड करणाऱ्या संशयितांना कडक शिक्षा करावी तसेच अशा घटना घडू नयेत, यासाठी ...
इचलकरंजी : भोजे मळ्यातील यंत्रमाग कारखान्यात घुसून तोडफोड करणाऱ्या संशयितांना कडक शिक्षा करावी तसेच अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, या मागणीचे निवेदन इचलकरंजी क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना दिले.
निवेदनात, एका टोळीने महावीर भोजे यांच्या यंत्रमाग कारखान्यात घुसून तेथील कामगारांना मारहाण करत दहशत माजवली व यंत्रमागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. अशा दहशतीच्या घटना घडल्या, तर उद्योजक उद्योगांपासून दूर जाईल. यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात सतीश कोष्टी, प्रकाश मोरे, विनय महाजन, पांडुरंग धोंडपुडे, विश्वनाथ मेटे, राजगोंडा पाटील, आदींचा समावेश होता.
(फोटो ओळी)
१११२२०२०-आयसीएच-०३
यंत्रमाग कारखान्यात घुसून तोडफोड करणाऱ्या संशयितांना कडक शिक्षा करावी, या मागणीचे निवेदन इचलकरंजी क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना दिले.