स्थगित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरळीतपणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 11:22 AM2018-08-23T11:22:26+5:302018-08-23T11:24:29+5:30
तांत्रिक कारणामुळे जुलै आणि आॅगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत काही दिवस स्थगित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून आता सुरळीतपणे सुरू आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोल्हापूर : तांत्रिक कारणामुळे जुलै आणि आॅगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत काही दिवस स्थगित झालेली मुंबई- href='http://www.lokmat.com/topics/kolhapur/'>कोल्हापूरविमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून आता सुरळीतपणे सुरू आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या कंपनीने तांत्रिक कारणामुळे स्थगित केलेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा दि. २९ जुलैपासून पुन्हा सुरू केली. त्यानंतर ही विमानसेवा योग्यपणे सुरू राहिली. पण, दि. १२ आॅगस्ट रोजी तांत्रिक कारणामुळे या मार्गावरील विमानफेरी कंपनीने रद्द केली.
अचानक फेरी रद्द केल्याने त्याचा फटका आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना बसला होता. याबाबत त्यांच्यासह अन्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, या कंपनीने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार मुंबई-कोल्हापूर विमानसेवा आता सुरळीतपणे सुरू आहे.
आठवड्यातून तीन दिवस ये-जा करणाऱ्या विमानफेरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. आठवड्यातील सात दिवस नियमितपणे विमानसेवा मिळावी. तिची वेळ सकाळी करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.