केएमटी बस अपघाताची चौकशी होणार, हंगामी चालक निलंबीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:12 PM2017-10-02T15:12:54+5:302017-10-02T15:22:02+5:30
कोल्हापूर येथील पापाची तिकटी ते गंगावेश रस्त्यावर रविवारी रात्री झालेल्या केएमटी बस अपघाताची चौकशी सुरु असून चौकशी अहवाल येताच दोषी असणाºया सर्व संबंधित कर्मचारी व अधिकाºयांवर सक्त कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी सोमवारी दिली. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यत वर्कशॉप विभागाचे प्रमुख एम. डी. सावंत व सहायक वाहतुक निरीक्षक रविंद्र धुपकर यांना सक्तीच्या रजेवर तर हंगामी चालक आर.पी. पाटील यास निलंबीत करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यत वर्कशॉप विभागाचे प्रमुख एम. डी. सावंत व सहायक वाहतुक निरीक्षक रविंद्र धुपकर यांना सक्तीच्या रजेवर तर हंगामी चालक आर.पी. पाटील यास निलंबीत करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर : येथील पापाची तिकटी ते गंगावेश रस्त्यावर रविवारी रात्री झालेल्या केएमटी बस अपघाताची चौकशी सुरु असून चौकशी अहवाल येताच दोषी असणाºया सर्व संबंधित कर्मचारी व अधिकाºयांवर सक्त कारवाई केली जाईल, कोणालाही सोडले जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी सोमवारी दुपारी पदाधिकाºयांच्या बैठकीत दिली.
जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यत वर्कशॉप विभागाचे प्रमुख एम. डी. सावंत व सहायक वाहतुक निरीक्षक रविंद्र धुपकर यांना सक्तीच्या रजेवर तर हंगामी चालक आर.पी. पाटील यास निलंबीत करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रविवारी झालेल्या अपघातात दोन निष्पापांना जीव गमावण्याची तर सतरा नागरीकांना जखमी होण्याची वेळ आल्यामुळे त्याचे पडसाद सोमवारी पदाधिकाºयांच्या आक्रमक भुमिकेतून उमटले. महापौर हसिना फरास, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, परिवहन सभापती नियाज खान, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक शेखर कुसाळे, अशोक जाधव यांनी सकाळी बुध्दगार्डन येथील वर्कशॉप गाठले. या सर्वांनी वर्कशॉप विभागातील सर्व संबंधित अधिकाºयांची चांगलीच कानउघडणी केली.
ताबुत विसर्जन असल्याने मिरवणुक मार्गावर बस वाहतुक का सुरु ठेवली होती, आणि नादुरुस्त बस प्रवासी वाहतुकीला का सोडली या दोन प्रश्नावरच वर्कशॉप विभाग प्रमुख एम.डी. सावंत व सहायक वाहतुक निरीक्षक रविंद्र धुपकर यांना फैलावर घेतले. त्यातच वाहतुक विभागाकडील सर्व चालक व वाहकांनी वर्कशॉप विभागाकडून चांगल्या अवस्थेतील बसेस दिल्या जात नाहीत, नादुरुस्त बसेस असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. तक्रारी केल्या तर तुला नोकरी करायची आहे की नाही अशा शब्दात दम दिला जातो अशा तक्रारी केल्यामुळे महापौरांसह सर्वच पदाधिकारी या दोन अधिकाºयांवर भडकलेच.
आयुक्त अभिजित चौधरी यांना महापौर फरास यांनी फोन करुन बैठकीस येण्याची विनंती केली. त्यावेळी आयुक्तही दहा मिनिटात त्याठिकाणी पोहचले. पदाधिकारी, चालक यांनी वर्कशॉप विभागाचा कारभारावर आयुक्तांसमोरच ताशेरे ओढले. नियाज खान , शारंगधर देशमुख यांनी तर दुपारी चार वाजेपर्यंत सावंत व धुपकर या दोन अधिकाºयांना निलंबीत अथवा सक्तीच्या रजेवर घालवले नाही तर मात्र आम्ही सर्व नगरसेवक रस्त्यावर उतरु, असा इशाराच आयुक्तांना दिला. त्यामुळे सावंत व धुुपकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचे तसेच रविवारच्या अपघाताची चौकशी केली जाईल, आणि या अपघातास जो कोणी जबाबदार असेल तर त्या सर्वांवर सक्त कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आयुक्त चौधरी यांनी दिली.