ग्राहकांशी मगु्ररीने वागाल तर जाग्यावर निलंबन; हसन मुश्रीफ यांचा कर्मचाऱ्यांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:43 AM2018-10-03T00:43:42+5:302018-10-03T00:43:50+5:30
कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या शाखांत येणाºया प्रत्येक ग्राहकाची सौजन्याने विचारपूस करून व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करा. ग्राहकांशी मगु्ररीने वागल्याची तक्रार आल्यास जाग्यावर निलंबित केले जाईल. कोणाचीही गय करणार नसल्याचा इशारा जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. आर्थिक वर्षातील सहा महिन्यांचा कालावधी राहिला आहे. आपली मक्तेदारी संपली असून, ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन व्यवसाय वृद्धीचा इष्टांक पूर्ण करा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा बॅँकेच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी आयोजित कर्मचाºयांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्यावर्षी दिलेले उद्दिष्ट आणि पूर्तता यांची तुलना केली तर आपण खूप मागे राहिलो. तरीही काटकसरीचा कारभार करून संस्थांना आठ टक्के लाभांश आणि कर्मचाºयांना नऊ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला. साखरेला हमीभाव मिळाल्याने साखर उद्योग स्थिरावला आहे. आता साखर उद्योगाला कर्ज देण्याची भीती नाही; पण आपल्याकडे पैसे कमी पडतात. त्यासाठी शेअर्स भांडवल व ठेवी गोळा करण्यासाठी कामाला लागा. मुदत संपलेल्या ठेवी पुन्हा आपल्याकडे कशा राहतील, यासाठी प्रयत्न करा. आम्ही प्रामाणिकपणे काम करीत आहोत, तसे तुम्हीही करा. पूर्वीचे दिवस विसरा. मक्तेदारी संपली असून काम करणारेच करत राहतात इतरजण पुढारीपण करीत असल्याच्या युनियनच्या तक्रारी आहेत. रजा न टाकता कोणी उद्योग करीत असेल तर त्याचे नुसते नाव कळवा; तो कितीही जवळचा असला तरी त्याची गय करणार नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, व्यवस्थापक जी. एम. शिंदे, बी. एस. कालेकर, रणवीर चव्हाण, संचालक पी. जी. श्ािंदे, भैया माने, अनिल पाटील, उदयानी साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.
मुश्रीफ यांच्यामुळेच बँक सक्षम
हसन मुश्रीफ यांच्या कुशल नेतृत्वामुळेच १७४ कोटींचा संचित तोटा कमी करून बॅँक नफ्यात आली. त्यांचे कागलमधील राजकारण काय असेल ते असेल; पण त्यांनी बॅँकेतील चुकीचे पायंडे बंद केल्याचे पी. जी. शिंदे यांनी सांगितले.
तुमच्याप्रमाणे बँकेचा इंडेक्स वाढवा
बॅँकेचे आतापर्यंत ७०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले तरी पगारात वाढ होत गेली. दर तीन महिन्यांनी इंडेक्सप्रमाणे पगारात वाढ होत असल्याने आता पगारावर १०० कोटी खर्च होतो. तुमचा इंडेक्स वाढतो तसा बॅँकेचाही वाढवा, असा चिमटा मुश्रीफ यांनी काढला.
‘महालक्ष्मी’ पुनर्गुंतवणूक
योजनेचा प्रारंभ
तीन वर्षे मुदतीच्या व १०.५२ टक्के व्याजाच्या ‘महालक्ष्मी पुनर्गुंतवणूक ठेव योजने’चा प्रारंभ करण्यात आला. यामध्ये पाच हजारांपासून ठेव ठेवता येणार असून डिसेंबर २०१८ पर्यंत मुदत राहणार आहे.